Eighth death due to corona in Nagpur 
नागपूर

या शहरात मे महिन्यात सर्वाधिक मृत्यू; एकूण मृत आठ तर बाधितांचा आकडा 426

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असतानाचा मृत्यूचीही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तब्बल आठवड्याभराच्या अंतरानंतर सोमवारी एकाचा मृत्यू झाला. मागच्या सोमावारी (ता. 18) एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरात एकूच मृतांची संख्या आठ झाली आहे. तसेच एका एसआरपीच्या जवानासह एकूण तीन रुग्ण बाधित आढळले आहेत. यात एका गर्भवतीचा समावेश आहे. यामुळे नागपूर शहरातील बाधितांचा आकडा 426 वर जाऊन पोहोचला आहे. 

आतापर्यंत आठ मृत्यूची नोंद नागपूरच्या कोरोना डायरीत झाली आहे. संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. ही बाब प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरू शकते. एकीकडे लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. दुसरीकडे तुकाराम मुंढे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

मध्यंतरी नागपूर रेड झोनमधून निघाल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. यामुळे नागरिक आनंदी झाले होते. मात्र, तुकाराम मुंढे यांनी नागपुरात पहिलेसारखेच नियम कायम राहतील, अशी घोषणा केली. यामुळे नागपूरकरांची पार निराशा झाली. इतक्‍या कडक प्रमाणात लॉकडाउन असतानाही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे लॉकडाउन न काढलेच बरे होईल, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. 

मे महिन्यात सर्वाधित मृत्यू

नागपुरात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचा आकडा कमी आहे. पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर दुसरा मृत्यू व्हाला बराच वेळ लागला. यामुळे शहरात मृत्यूदर कमी होते. मात्र, मे महिन्यात अद्याप सहा जणांनी आपला जीव गमवला आहे. अजून मे महिना संपायला पाच दिवस शिल्ल्क आहे. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात फक्‍त दोनच व्यक्‍तींचा जीव गेला होता. 

शहरातील कोरोनाचे मृत्यू

- 5 एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील रोजी 68 व्यक्तीचा मृत्यू 
- 29 एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
- 5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू 
- 11 मे रोजी पांढराबोडी येथील 29 वर्षीय युवकाचा मृत्यू 
- 16 मे रोजी गड्डीगोदाम येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 
- 17 मे रोजी शांतीनगर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
- 18 मे रोजी मोमीनपुरा येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू 
- 25 मे एकाचा मृत्यू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT