Elderly man cheats in Nagpur by a London woman Crime news 
नागपूर

‘मी दिल्ली विमानतळावर आहे, मौल्यवान सामान सोडवण्यासाठी पैशांची गरज आहे’ असं म्हणत केली फसवणूक

योगेश बरवड

नागपूर : फेसबुकवरून मैत्री झालेल्या लंडनच्या महिलेने लक्ष्मीनगरातील वृद्धाला जाळ्यात अडकवून ९ लाख ८५ हजारांनी फसवणूक केली.

पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगरातील रहिवासी ६६ वर्षीय अनिल मुलावकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. लंडन येथील लिंडा थॉमसन नाव सांगणाऱ्या महिलेने ऑक्टोबर २०२० मध्ये फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. मुलावकर यांनी सहजतेने ती स्वीकारली. त्यानंतर चॅट सुरू झाले. भारतात येणार असून आल्यावर भेटणार असल्याचेही तिने सांगितले होते.

७ ऑक्टोबरला लिंडाने भारतात आल्याची आणि दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने मौल्यवान सामान जप्त केल्याची बतावणी केली. सोबतच दंड भरण्यासाठी भारतीय चलनाप्रमाणे ९५ हजार रुपयांची तातडीने गरज असल्याचे सांगितले. कस्टम विभागाच्या अधिकारी असल्याचे सांगून एका महिलेशी बोलणेही करून दिले.

तिच्यावर विश्वास ठेवत मुलावकर यांनी तिच्या खात्यात पैसे पाठविले. दुसऱ्या दिवशी पुन्हा लिंडाने फोन करून तीन लाख रुपयांची मागणी केली. बँक खाते लंडनचे असल्याने पैसे काढू शकत नसल्याचे तिचे म्हणणे होते. टप्प्याटप्प्याने ९.८५ लाख घेतल्यानंतर तिचा फोन बंद झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलावकर यांनी तक्रार नोंदविली. त्याआधारे बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

प्रसिद्ध युट्यूबरचा 1.20 मिनिटाचा MMS लीक? व्हायरल व्हिडिओची पोलखल: सत्य समोर

SCROLL FOR NEXT