exam esakal
नागपूर

'खर्चपाणी द्या, सर्व पेपर काढून देतो', प्राध्यापकाची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच परीक्षा रद्द

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एका महाविद्यालयाने ऑनलाइन परीक्षेऐवजी (online) ऑफलाइन परीक्षेचे आयोजन करीत विद्यार्थ्यांना सर्व पेपरमध्ये उत्तीर्ण करून देण्याच्या नावावर पैसे मागण्यात येत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल (viral audio clip of professor ) झाली. या क्लिपबाबत माहिती मिळताच विद्यापीठाने (nagpur univeristy) गोंदिया येथे असलेल्या महाविद्यालयातील परीक्षा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. (exam cancelled after viral audio clip of professor of gondia college)

विद्यापीठाद्वारे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याचे निर्देश दिलेत. यानुसार ५ ते ३१ मेदरम्यान पेपर घेण्यात येणार आहेत. यापूर्वीच पेपर दिल्यावर त्याचे उत्तर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर देण्याचा प्रकार समोर आला. मात्र, यावेळी गोंदियातील एका एमबीए अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाने आजपासून सुरू झालेल्या प्रथम सेमिस्टरच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी चक्क पैशाची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकाराने एकच खळबळ माजली. क्लिप व्हायरल होताच संबंधित महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तशा सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिल्यात. याशिवाय त्यांना याबाबत उत्तर सादर करण्यात आल्याचेही समजते. याबाबत डॉ. साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला. मात्र, महाविद्यालयाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांचे पेपर -

महाविद्यालयात बुधवारपासून सुरू झालेल्या ऑफलाइन पेपरदरम्यान कोरोनाबाधित असलेल्या विद्यार्थ्यांनाही पेपर देण्यास बोलाविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे इतरांनाही संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, कोरोनाकाळात महाविद्यालयाने ऑफलाइन परीक्षा घेतलीच कशी, हा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक

Latest Maharashtra News Updates Live: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

हळदीकुंकवात करंडे- फण्या देऊन कंटाळलात? डीमार्टमध्ये १५ रुपयापासून मिळतायत भन्नाट ऑप्शन; वाचा यादी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रकल्पांना भूसंपादनाचे ग्रहण; शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन चिंतेत

SCROLL FOR NEXT