Exams are near and study rooms are closed for students in Nagpur  
नागपूर

ऐन स्पर्धा परीक्षांच्या तोंडावर अभ्यासिका केल्या बंद; विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; कोरोनामुळे होणार नुकसान 

राजेश रामपूरकर

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने टाकलेल्या निर्बंधामुले शहरातील अभ्यासिका आणि ग्रंथालये बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पंधरा दिवसावर आलेल्या ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी कशी करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आज मंगळवारी अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

कोरोनामुळे महापालिकेने अनेक निर्बंध जाहीर केले. त्यानुसार शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. शाळा, महाविद्यालये बंद करताना ग्रंथालये आणि अभ्यासिका बंद करण्याचा कुठलाही उल्लेख महापालिकेच्या आदेशात नाही. तरीही अभ्यासिका का बंद केल्या असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 

कोरोनामुळे वर्षभरात चारदा रद्द झालेली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अखेर १४ मार्चला होणार आहे. टाळेबंदीनंतर परीक्षेच्या तारखा जाहीर होताच अभ्यासाने जोर धरला. गावाकडे परत गेलेले विद्यार्थी नागपूरात भाड्याच्या खोलीत राहून अभ्यासिकांमध्ये परीक्षांची तयारी करत आहेत. 

पंधरा दिवसांवर परीक्षा आल्याने आधीच तणावात असलेल्या विद्यार्थ्यांसमोर आता अभ्याससिका बंद झाल्याने नवे संकट उभे झाले आहे. या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठासह अन्य खासगी व अनुदानिक ग्रंथालय आणि अभ्यासिकांचा मोठा आधार असतो. नुकताच विद्यापीठाने २४ तास अभ्यासिका सुरू ठेवण्याचा निर्णयही घेतला. मात्र, परीक्षेच्या तोंडावर अभ्यासिका बंद करण्यात आल्याने नाराजीचा सुर आहे.

इतरत्र अभ्यासिका सुरू

कोरोनाची स्थिती पुणे आणि मुंबईमध्येही नागपूरप्रमाणेच आहे. असे असतानाही तेथील स्थानिक प्रशासनाने काही निर्बंध घालून अभ्यासिका सुरू ठेवण्याचे आदेश दिले. पुण्यात अभ्यासिकांमधील उपस्थिती ५० टक्के करण्यात आली. मात्र, नागपूर महापालिकेने कुठलाही विचार न करता सरसकट अभ्यासिकांमधून विद्याथ्र्यांना बाहेर काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविरोधात रोष आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT