Extension of degree admission till September thirty 
नागपूर

महाविद्यालयांना दिलासा मिळेल काय? ४० टक्केच प्रवेश; विद्यार्थ्यांचा नामवंत महाविद्यालयांकडे कल

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन पदवी प्रवेश प्रक्रियेत यंदा केवळ ५० हजारांवर प्रवेश नोंदविण्यात आले आहे. यापैकी ६० टक्के प्रवेश नामवंत महाविद्यालयांमध्ये झाले आहेत. इतर महाविद्यालयांमध्ये केवळ ४० टक्के प्रवेश नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पदवी प्रवेशाला प्रशासनाकडून ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या पदवी प्रवेशासाठी १७ जुलैपासून सुरुवात झाली. १७ ऑगस्टला १२ वाजता गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी प्रकाशित करण्यात आली. यानंतर २० ते २४ ऑगस्टपर्यंत गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येणार होते.

२५ ते २८ ऑगस्टदरम्यान प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार होते. मात्र, कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याची बाब समोर आल्याने विद्यापीठाने दोन दिवस म्हणजे ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

१ लाख ८ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली. यापैकी ८२ हजार ६३० विद्यार्थ्यांनी माहिती सादर केली. आता यापैकी केवळ ५० हजारांवर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश नोंदविले.

यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळविले. त्यामुळे इतर महाविद्यालयात अद्यापही ४० टक्केच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची मुभा असून, तोपर्यंत या महाविद्यालयांना दिलासा मिळेल काय, हा प्रश्नच आहे.

२० टक्के प्रवेशवाढीसाठी प्रस्ताव थंडबस्त्यात

नामवंत महाविद्यालयांमधील जागा फुल्ल झाल्याने त्यांनी २० टक्के वाढीव जागांसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविले आहे. मात्र, या वाढीव जागांच्या प्रस्तावाला इतर महाविद्यालयांनी विरोध दर्शविला आहे. या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी मिळत नसताना नामवंत महाविद्यालयांकडून वाढीव जागांची मागणी करणे चुकीचे असल्याचे कारण देण्यात येत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT