farmers asking about the compensation to family of no more farmer  
नागपूर

मृत शेतकऱ्याच्या वारसाला कर्जमाफीचा फायदा मिळणार कधी? काटोल तालुक्यातील वास्तव

सुधीर बुटे

काटोल (जि. नागपूर) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जधारक शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार होता. मात्र याअंतर्गत मृत शेतकऱ्याच्या वारसाला कर्जमाफीचा फायदा फायदा अद्यापही मिळाला नाही.

मृताची वारसदार असलेली पत्नी गहणाबाई देवराव सोमकुवर (८०) रा. वडविहिरा, तालुका, काटोल यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. देवराव कचरुजी सोमकुवर (८५) यांच्या नावे वडविहिरा येथे शेती आहे. त्यांनी पारडसिंगा येथील स्टेट बँकेतून जून २०१६ मध्ये शेतिविषयक कामासाठी एक लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यांचा ११ डिसेंबर २०१७ रोजी मृत्यू झाला, सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मृताची वारसदार पत्नी गहणाबाई यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला.

याअंतर्गत बँकेने गहणाबाई यांना आधार प्रमाणिकरण झाले असून कर्जमाफीचे प्रकरण जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले. यानंतर वृद्ध गहणाबाई यांनी वारंवार बँकत जाऊन कर्जमाफीबद्दल संबंधितांना विचारणा केली. मात्र त्यांना ठोस असे उत्तर मिळाले नाही. 

कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याने गहणाबाई यांनी काटोलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे उपविभागीय अधिकारी यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था, काटोल यांना ५ ऑक्टोबर २०२० रोजी पत्र देऊन मृताचे कर्जमाफीचे प्रकरण आपल्या विभागाशी संबंधित असल्याने वर्ग केले. मात्र संबंधित सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी आजमितीसदेखील कर्जमाफी प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

मृत शेतकऱ्याने शेतिविषयक कामासाठी घेतलेल्या कर्जावर ५ मार्च २०२० पर्यंत बँकेने व्याज आकारून १ लाख ३२ हजार ६१९ रुपये भरावयाचे असल्याचे गहणाबाईस सांगितले. परिणामी गहणाबाई यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी नागपूर, तहसीलदार यांच्याकडे अर्ज केले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT