The father had tried to poison the girl at Nagpur 
नागपूर

बापाने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला ठार मारण्यापूर्वी पाजले होते विष, पोलिस तपासात आले सत्य पुढे...

अनिल कांबळे

नागपूर : पत्नीसोबत झालेल्या क्षुल्लक वादानंतर रागाच्या भरात पित्याने नऊ महिन्याच्या चिमुकलीचा पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून खून केला होता. त्यानंतर बिअरच्या बॉटलने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी पित्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस तपासात पित्याने चिमुकलीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. यामुळे सर्वजण विचारत करीत आहे... एक पिता असही करू शकतो यावर कुणाचा विश्‍वास बसत नाही आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शेख (वय 30, रा. शंकर साई मठ, भांडे प्लॉट चौक, सक्‍करदरा) हा खासगी वाहनावर चालक आहे. तो पत्नी तबस्सुम (32), अल्बिना ऊर्फ बाई ऊर्फ नूर या नऊ महिन्याच्या चिमुकलीसह राहत होता. वाहन चालक असलेला सोनू लॉकडाउनमुळे बेरोजगार झाला होता. आर्थिक कोंडीमुळे तो सारखा चिडचिड करीत होता.

नैराश्‍यातून त्याने चिमुकली नूरला गुरुवारी मठजवळ ठेवलेल्या ड्रममधील पाण्यात बुडवून ठार मारले. त्यानंतर स्वत: विष घेऊन गळ्यावर घाव मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. चिमुकलीला ड्रममध्ये बुडवून मारण्यापूर्वी विष दिल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पत्नी तबस्सुम हिने दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. 

हाताला काम नाही. आई-वडील व भावांच्या भरवश्‍यावर घर चालत होते. स्वत: मुलीच्या दुधाचा खर्चही करता येत नव्हता. यामुळे काय करावे आणि काय नाही अशी चिंता सोनूला सतावत होती. मुलीच्या भविष्याची चिंता सतावत होती. मैं कैसा बाप हुँ... अस म्हणून तो स्वत:ला कोसत होता. मुलीच्या भविष्याच्या चिंतेतूनच त्याने असे कृत्य केले असावे, अशी शक्‍यता आहे.

लहान-सहान गोष्टीवरून घालायचा वाद

चार महिन्यांपासून सोनू शेख हा बेरोजगार होता. त्यामुळे घरात आर्थिक चणचण होती. घरातील खर्चही भागत नसल्यामुळे तो चिडचिड करीत होता. लहान-सहान गोष्टीवरून वाद घालत होता. खिशात पैसे नसल्यामुळे तो जीवनाला कंटाळला होता. मुलीच्या दुधाचाही खर्च तो करू शकत नव्हता. आई-वडील आणि भावांच्या कमाईवर घर चालत होते. 

'फोटो संभालकर रखना, ये अपनी आखरी यादें होंगी'

पाच दिवसांपासून सोनू हा तणावात होता. त्याने पत्नी तबस्सूमला बुधवारी तयारी करून ठेवण्यास सांगितले. पत्नी आणि मुलीला घेऊन तो थेट फोटो स्टुडिओत पोहोचला. त्याने "फॅमिली फोटो' काढून घेतले. "फोटो संभालकर रखना. ये अपनी आखरी यादें होंगी' असे तो पत्नीला म्हणाला. परंतु, पत्नीने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीषण दुर्घटना : एकादशीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी, चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

Viral News: ‘नाक कटवा’ची दहशत… भूत की माणूस? नेमकं कोण कापतंय लोकांची नाकं? पीडितांनी सांगितली भीषण कहाणी

Satyacha Morcha: मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! 'सत्याचा मोर्चा'पूर्वी वाहतूक निर्बंध आणि सुरक्षितता सल्लागार जारी

Akola Accident: मलकापूर हादरले दोन अपघातांनी! भरधाव वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा: कामांची निविदा प्रक्रिया 'सुपरफास्ट' करा; डॉ. प्रवीण गेडाम यांचे कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश

SCROLL FOR NEXT