A female teacher opened the door to digital education for the children of Tanda 
नागपूर

...अन् महिला शिक्षिकेने तांडा वस्तीतील मुलांसाठी डिजिटल शिक्षण आणले दारी

नीलेश डोये

नागपूर : मनात इच्छा असली आणि परिश्रम करण्याची तयारी असली की कोणतेही काम अशक्य नसते. याला प्रत्यक्षात उतरवत सुजाता भानसे या महिला शिक्षिकेने तांडा वस्तीतील गरीब मुलांसाठी डिजिटल शिक्षणच दारात आणले.

कोरोनामुळे गरीब तांड्या वस्तीत राहणाऱ्या लोकांवर बेरोजगारीचे संकट आले. लॉकडाउनच्या काळात सगळ्यात मोठा परिणाम शिक्षणावर झाला. एका अनिश्चित कालखंडाने सगळ्यांना अस्वस्थ केल. शाळा कधी सुरू होणार हे कुणीच ठामपणे सांगू शकत नव्हत.

गरीब तांड्यावस्तीत राहणाऱ्या शाळेतील मुलांच शिक्षण पूर्णपणे बंद झाल. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या कुटुंबासाठी स्मार्टफोन विकत घेणे अतिशय कठीण बाब झाली. त्यामुळे अशा तांड्या वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचं काय, असा ज्वलंत प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला.

तांड्या वस्तीतील लोकांवर आर्थिक तंगीमुळे जीवनस्तर निम्न झाल. अशा परिस्थितीत आपल्या मुलांना चांगल्या प्रतीचं शिक्षण देणे हे त्यांच्यासाठी स्वप्नच ठरल आहे. मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड नवीन गॅजेट्स आदी तंत्रज्ञानापासून ही मुले अनभिज्ञ राहू नयेत ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव निपाणी, वाडी येथील शिक्षिका सुजाता भानसे यांनी ‘ओटला डिजिटल शाळा’, ‘आपल्या दारी’चा प्रारंभ केला. प्रोजेक्टरद्वारा वर्ग विषय, आरोग्य शिक्षण मनोरंजन, खेळ, कृषी, स्वयं सुरक्षा आदी अनेकाविध बाबींच शिक्षण दिले.

घरीच शिक्षण देण्याचा प्रयत्न
ऑनलाइनमुळे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी घरीच शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. 
- सुजाता भानसे,
शिक्षिका, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''..तर अजितदादांनी आम्हांला तसं सांगितलं असतं'', दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Solapur News: रखडलेल्या बसवेश्वर पुतळ्यासाठी २४ संघटना एकवटल्या; भरघोस निधी असतानाही प्रत्यक्ष काम न झाल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

MSME Budget 2026: निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पातून ट्रम्प यांना खणखणीत उत्तर; एमएसएमईच्या बळकटीकरणामुळे युरोपीय बाजारपेठेत भारताचा दबदबा!

Pune Dirty City Controversy : पुणे घाणेरडे शहर, बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने व्यक्त केलेला तिरस्कार, एपस्टीन फाइल्समध्ये धक्कादायक खुलासा

लग्नानंतर 14 वर्षांनी सुपरस्टार अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म

SCROLL FOR NEXT