Fighting in two groups over the sound of a DJ 
नागपूर

खीर-प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम; दर्ग्याजवळ डीजेवर लावली कव्वाली अन् निघाले धारदार शस्त्र

अनिल कांबळे

नागपूर : एका धार्मिक कार्यक्रमात डीजेवर मोठ्या आवाजात कव्वाली सुरू होती. दरम्यान, आवाज कमी करण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. आरोपींनी तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना लकडगंज भागात घडली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख फैजान शेख इस्माईल (२४, रा. जुनी मंगळवारी, हत्तीनाला रोड) असे फिर्यादीचे नाव आहे. राईन शेख सलीम शेख, (२०) असे जखमीचे नाव आहे. राकेश रामदास बोरीकर (२७) , सतीश रामदास बोरीकर (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. दोन्ही गटाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तक्रारदार शेख फैजान शेख इस्माईल व मित्र समीर अली शौकत अली (१९) , कुणाल टाकळीकर (१९) आणि राईन यांनी त्यांच्या मोहल्यातील धार्मिक स्थळावर खिर-प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम ठेवला होता.

यादरम्यान त्यांनी दर्ग्याजवळ डीजेवर कव्वाली गाणे वाजविले. त्यावेळी राकेश व सतीश यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. यावरून आरोपींनी शिवीगाळ करून लोखंडी रॉड व लाकडी दंडा व फावड्याने फैजानचा मित्र राईनच्या डोक्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.

तसेच यांच्या दोन मित्रांच्या हातावर पायावर मारून जखमी केले. राईनला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३२६, ५०४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. दरम्यान दुसरी तक्रार आरोपींची आई छाया रामदास बोरीकर (५०, रा. कवडूजी पाटील आखाड्याजवळ, जुनी मंगळवारी) यांनी फैजान व इतर पाच ते सहा आरोपींविरुद्ध दिली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT