Fire in Ambazari Biodiversity Park in Nagpur Latest News  
नागपूर

ब्रेकिंग: उपराजधानीतील अंबाझरी जैवविविधता उद्यानात भीषण आग; अग्निशमन विभागाचे एकूण ७ बंब घटनास्थळी दाखल 

राजेश रामपूरकर

नागपूर: अंबाझरी जैवविविधता उद्यानाला लागलेली आग वाळलेल्या गवतामुळे वेगाने पसरली. सध्या या आगीने सुमारे ५० हेक्टर परिसर कवेत घेतल्याची माहिती उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल यांनी दिली. विद्यापीठाच्या बाजूने दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली. गवतामध्ये कागद तसेच पाॅलिथिनचे तुकडे असतात. पेट घेतल्यावर हे तुकडे उडून इतरत्र पडतात. त्यामुळेही आग पसरली असे शूक्ल यांनी सांगितले.

सुमारे ७५० हेक्टर परिसरातील या संरक्षित जंगलाचे व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या या जैवविविधता उद्यानामुळे शहरालगत निसर्गभ्रमणाची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे. 

इतर आवश्यक सुविधांसह सायकल राइड आणि ई-वाहनातून सफारीचीही सुविधा या उद्यानात आहे. छायाचित्रण आणि पक्षीनिरीक्षणासाठीही अनेक निसर्गप्रेमी या उद्यानात येतात. मात्र, या आगीच्या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमनदलाचे ५ तसेच एमआयडीसी व वाडी नगर परिषदेचा प्रत्येकी १ असे सात बंब लागले आहे.

यापूर्वीही लागली होती आग 
 
अंबाझरी जैवविविधता उद्यानात ही आगीची पहिली घटना नाही. गेल्या वर्षी मे महिन्यातही इथे वाळलेल्या गवतामुळे आग लागली होती. या आगीत इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तसंच अनेक पक्ष्यांचाही या आगीमुळे मृत्यू झाला होता.   

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी 'हे' नाव फायनल?

Cyclist Died during Tour: दुर्दैवी! शर्यतीदरम्यानच १९ वर्षांच्या सायकलपटूचा अपघातात मृत्यू; नेमकं काय झालं, जाणून घ्या

Nagpur Crime : पत्नीस पोटगी देण्यासाठी झाला सोनसाखळी चोर

Virar News : उत्तर भारतीयांची मते कोणाला? यावर वसई विरारमध्ये घडताहेत चर्चा

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

SCROLL FOR NEXT