firing on the family by 7 to 8 people in kalmeshwar  
नागपूर

कळमेश्वरात भरदिवसा घडली थरकाप उडवणारी घटना; घरात घुसून अज्ञात तरुणांनी... 

चंद्रकांत श्रीखंडे

कळमेश्वर (जि. नागपूर) ः नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. हत्येच्या तब्बल 4 प्रकरणांनी आधीच नागपूर जिल्हा हादरला असताना आता अजून एक जीवाचा थरकाप उडवणारी घटना कळमेश्वर तालुक्‍यात घडली आहे. 

वाहनचालक असलेले गणेश मेश्राम (वय 32), त्यांची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम (वय 28) आणि त्यांचा 4 वर्षीय मुलगा हे तिघेही कळमेश्वर येथे भाड्‌याने राहत होते. हे दाम्पत्य मूळचे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील रहिवासी आहे. मात्र, या सुखी कुटुंबासोबत असे काही घडले, ज्याचा त्यांनी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल. या कुटुंबासोबत घडलेली घटना कळमेश्वरमधील प्रत्येक व्यक्तीचे मन सुन्न करणारी आहे. 

नक्की काय घडले? 

कळमेश्वर येथील श्रीनिकेन कॉलनी येथील सुधाकर खाडे यांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून मेश्राम भाड्‌याने राहत होते. सोमवारी, 20 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 वाजताच्या सुमारास 6 ते 7 अज्ञात तरुण त्यांच्या घरात जबरदस्ती घुसले. इतकच नाही तर या सर्वांनी गणेश मेश्राम, त्यांची पत्नी आणि मुलावर बेछूट गोळीबार सुरू केला. हे सर्व अज्ञात तरुण तोंडाला कापड बांधून होते. या धक्कादायक प्रकारात तिघेही गंभीर जखमी झालेत. गोळीबाराचा आज ऐकून आजूबाजूच्या लोकांनाही धडकी भरली. विशेष म्हणजे, ही घटना पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडली आहे. 

दैव बलवत्तर म्हणून... 

सुदैवाने या गोळीबारात प्राणहानी झाली नाही. मात्र, गणेश मेश्राम यांच्या पाठीला व पायाला गोळी लागल्याची माहिती आहे, तर त्यांची पत्नी प्रियंका हिच्या पोटावर गोळी लागली. यात गणेश मेश्राम गंभीर जखमी झाले. पत्नी प्रियंका ही सुद्धा जखमी झाली, मात्र चिमुकला मुलगा सुखरूप बचावला. जखमींवर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

काय आहे गोळीबाराचे कारण 

गोळीबाराचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण ही घटना जुन्या वादातून घडल्याची चर्चा आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून गणेश मेश्राम यांची पत्नी प्रियंका यांच्या बयाणानंतर घटनेची वस्तुस्थिती समोर येण्याची शक्‍यता आहे. या घटनेचा तपास नागपूर ग्रामीण पोलिस उपअधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेरचे पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक संबळकर, कळमेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती मुळक सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध घेत आहेत. 
 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बनावट आयपीएसने आधीही केलेत कांड, परराज्यात नावावर गुन्हा; पत्नी आहे पोलीस अधिकारी

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Leopard Attacks: शिरूरमध्ये संतापाचा स्फोट! बिबट्यांच्या हल्ल्यांवर निष्क्रिय प्रशासनाविरोधात तहसीलदार कार्यालयाला टाळे"

Latest Marathi News Live Update : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Girish Mahaja : नाशिक-त्र्यंबक रस्ता पाडकाम वाद मिटला! गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर १३ दिवसांचे साखळी उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT