Five suspects of new corona in medical hospital 
नागपूर

अख्ख नागपूर टेंशनमध्ये! महिनाभरात १८० जण विदेशातून परतले, फक्त ५० जणांचा लागला शोध

राजेश प्रायकर

नागपूर : गेल्या महिनाभरात विदेशातून १८० जण शहरात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ५० जणांना महापालिकेने शोधून काढले आहे. दरम्यान, काल शहरात आलेल्या विमानप्रवाशांचा तपासणी अहवाल आला असून दोघे पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना विलगीकरणात पाठविण्यात आले. दरम्यान, मेडिकलमध्ये नवीन कोरोनाचे पाच संशयित असून पुण्यावरून त्यांच्या चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. 

यूके तसेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाने थैमान घातल्याने राज्य सरकारने महापालिकांना शहरात मागील महिनाभरात विदेशातून आलेल्यांची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. विमानतळ व्यवस्थापनाकडून महापालिकेला मागील एका महिन्यात विदेशातून आलेल्या १८० जणांची यादी सोपविण्यात आली आहे. यातील ५० जणांचा महापालिकेने शोध घेतला.

महापालिकेनेच इंग्लंडवरून आलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णाला शोधून काढले होते. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आणखी चार जण आढळून आले होते. दरम्यान, शहरात आलेल्या १८० पैकी १३० जणांचा महापालिका त्यांच्या पासपोर्टवरून शोध घेत आहे.

महापालिकेचे पथक विदेशातून आलेल्या नागरिकांच्या घरापर्यंत जात आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. आतापर्यंत सापडलेल्या ५० जणांपैकी बहुसंख्य नागरिक निगेटिव्ह आहेत. 

दरम्यान, रविवारी शहरात अहमदाबादवरून २, गोव्यातून एक तर दिल्लीवरून ४ असे सात विमाने आली. यातून ७६१ प्रवासी आले आहेत. यापैकी सौम्य लक्षण आढळून आलेल्या १०१ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या सर्वांचा चाचणी अहवाल आला.

यात दोघे पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. पुढील सहा दिवस विलगीकरणानंतर पुन्हा त्यांची चाचणी करण्यात येणार असल्याचे सूत्राने नमूद केले. यात ते पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आल्यास नव्या कोरोनाचे संशयित म्हणून त्यांना मेडिकलमध्ये पाठविण्यात येणार आहे.

‘त्या’ १३० जणांना शोधण्याचे आव्हान

विदेशातून शहरात आलेले १३० जण अजूनही महापालिकेच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांना शोधण्यात येत आहे. यातील काही जण शहरात राहून इतर शहरात गेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेण्यात येत असल्याचे महापालिकेतील सूत्राने नमूद केले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT