Food packing was done in front of the railway station
Food packing was done in front of the railway station 
नागपूर

आरोग्याशी खेळ : उघड्यावरच होते खाद्यपदार्थांची पॅकिंग; रेल्वेचे अधिकारी, कंत्राटदार घेत नाहीत दखल

योगेश बरवड

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या समोरच रस्त्याच्या कडेला उघड्यावरच म्हणता येईल अशा पद्धतीने जेवण तयार केले जाते. तिथेच पॅकिंगही केले जाते. कोरोनाकाळातही मास्क किंवा हॅन्डग्लोव्हज शिवाय खाद्यपदार्थांची धोकादायक पद्धतीने होणारी हाताळणी रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जेवण स्वच्छ वातावरणात तयार व्हावे हा रेल्वेचा पूर्वीपासूनच कटाक्ष राहिला आहे. त्यासाठीच रेल्वेच्या बेस किचनमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तोच नियम जेवण तयार करणाऱ्या कंत्राटदारासाठीही आहे. परंतु, त्याचे पालन होताना दिसत नाही. नागपूर रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पुलाखालील एका गाळ्यात कंत्राटदाराकडून जेवण तयार केले जाते. लगतच्या रस्त्यासह पुलावरून सतत वर्दळ असते. विशेष म्हणजे कोणताही ऋतू असो समोरील रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने दुर्गंधीही असते.

वाहणाऱ्या पाण्याबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रार करण्यात येतात. अद्याप या समस्येवर उपाय सापडू शकलेला नाही. याही परिस्थितीत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कमऱ्यात रेल्वे प्रवाशांसाठी जेवण तयार होते. दर्शनी भागात प्लॅस्टिकचा पडदा असला तरी तो नेहमी उघडा असतो. तिथेच डबेही पॅक होतात. कोरोनाकाळात प्रत्येकाने मास्क लावणे आणि खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांनी हॅन्डग्लोव्हज घालणे बंधनकारक आहे.

पण, अगदी समोर असणारा कर्मचारी वगळता आतील सर्वांचे मास्क तोंडा ऐवजी हनुवटीवर असते. हातात ग्लोव्जही दिसत नाही. हा प्रकार धोकादायक आणि गंभीर असल्याची बाब रेल्वेतून नियमित प्रवास करणाऱ्या एका सजग प्रवाशाने नाव न पुढे करण्याच्या अटीवर लक्षात आणून दिली, हे विशेष. त्याने कर्मचाऱ्यांकडे विचारणाही केली. पण, त्याला कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तर दिले.

नियमावलीकडे डोळेझाक

रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणारे जेवण किंवा खाद्यपदार्थ तयार करण्यासह हाताळणीसंदर्भात रेल्वेची नियमावली आहे. कंत्राटदाराचे कर्मचारी मात्र त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. पण, त्याकडेही दुर्लक्ष केले जात असून, रेल्वेचे संबंधित अधिकारीही कोणतीच दखल घेत नसल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT