Foreign return in Gram Panchayat elections election news 
नागपूर

ग्रामपंचायत निवडणुकीत उतरला ‘फॉरेन रिटर्न’; मोठ्या पगाराची नोकरी सोडून धरली ग्रामविकासाची कास

दिलीप चौहान

मांढळ (जि. नागपूर) : सद्या ग्रामीण भागात निवडणुकीचा ज्वर चढलेला आहे. उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी वेगवेगळ्या कृल्प्तया लढवित आहेत. गावच्या राजकारणात उतरून ग्रामविकास करण्याचा प्रत्येकांकडून दावा करण्यात येत आहे. मात्र, अशा वातावरणात चक्क एक उमेदवार सगळ्यांच्या कुतुहलाचा झाला आहे. उमेदवार चक्क ‘फॉरेन रिटर्न’ असल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

कुही तालुक्यातील उमरेड शहराच्या सीमेलगत असलेल्या तारणा ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेले उमेदवार गणपत मारोती लुचे हे चक्क दुबई व सौदी अरेबियात नोकरी करून परत आले व आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एखाद्या चित्रपटात उच्चशिक्षित तरुण विदेशी शिक्षण घेऊन गावाकडे येतो. विकासाअभावी गावातील लोकांचे होत असलेले हाल बघून चिडून उठतो. अगदी तस्सेच गणपतचे झाले आहे.

तारणा येथील ३० वर्षीय अविवाहित तरुण गणपत चक्क निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. गणपतने विदेशात सात वर्षे नोकरी केली. लाख रुपयांच्या नोकरीला बाजूला सारून हा तरुण तारणा ग्रामपंचायत निवडणुकीत उतरला आहे. ५० वर्षांपासून प्रस्थापितांनी गावचा कारभार केल, मात्र गरीब गरजू माणसाला शासनांच्या योजनांपासून दूरच ठेवण्यात आले. म्हणून मी गावातच राहून प्रगती करायचे ठरवले, असे गणपत यांचे म्हणणे आहे.

आजच्या घडीला जो तो शहराकडे धाव घेतो. शहरातील आधुनिक जीवनशैली, राहणीमान आणि रोजगार या गोष्टी त्यांना आकर्षित करतात. पर्यायाने खेड्यांची स्थिती बिकट होत चालली आहे. खेडी स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. कारण, आपला भारत कृषिप्रधान देश आहे. वर्षभर कधीही आळस न करता शेतात राबराब राबणारा शेतकरीराजा पूर्ण देशाला अन्नधान्य पुरवतो आणि त्यावरच समाजाचे जीवनमान चालते.

खेडी सुधारली तरच देशाचा विकास होईल

शेतकरी प्रामुख्याने खेड्यांत राहत असल्यामुळे गावात सुखसोयी उपलब्ध करणे आणि त्याला स्वयंपूर्ण बनविणे, रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. खेडी सुधारली तरच देशाचा विकास होईल. बहुतेक तरुण शहरात राहू सुखी जीवन व्यतीत करण्याचे स्वप्न बघतात. अशा काळात हा ‘फॉरेन रिटर्न’ तरुण विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ग्रामविकासाची कास धरून रिंगणात उतरला आहे. त्याची तालुकाभर चर्चा आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT