नागपूर

कोविड आढावा : खासगी हॉस्पिटलमधील बिलांच्या तपासणीसाठी समिती गठित करा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खाजगी हॉस्पिटल्सने (Private hospital) ८० टक्के बेड्स उपलब्धतेबाबत दर्शनी भागात फलक लावतानाच महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या दराप्रमाणे वैद्यकीय उपचार दिले गेले नसल्याच्या काही ठिकाणी तक्रारी आहेत. बिलांचे परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठण (Formation of committee) करा. सत्य जनतेपुढे येऊ द्या, असे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी शनिवारी महापालिका आयुक्तांना दिले. (Form a committee to examine bills in private hospitals)

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोविडसंदर्भात आढावा त्यांनी घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम लसीकरण सद्य:स्थिती, केंद्रे, साठा वाढविण्यासाठी उपाययोजना, लोकसहभाग यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी या चर्चेमध्ये सद्य:स्थिती विशद केली. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना वेळेत दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी केली. तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या उपाययोजनेचा तपशील पालकमंत्र्यांनी मागितला.

ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेचे उग्ररूप ग्रामीण भागात राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणा बळकट करणे सुरू असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, औषध पुरवठा, आवश्यक यंत्र पुरवठा आणि बेड वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासोबतच ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या खाजगी डॉक्टरांकडून रुग्णसेवा व्हावी, यासाठी त्यांचे प्रशिक्षण व त्यांच्याशी समन्वय ठेवला जात असल्याचे सांगितले.

म्युकरमायकोसीस औषधांची मात्रा कशी असते, औषध किंमत, शस्त्रक्रिया खर्च आणि गरिबांसाठी माफक दरात कसे करता येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञाचा एक गट तयार करून एस.ओ.पी.निश्चित करून सात दिवसांत जिल्हा प्रशासन या संदर्भात अहवाल देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

लसीकरणाबाबत राजकारण व्हायला नको. सर्व राजकीय मतभेद विसरून नागपूरमध्ये सध्या काम चालू असून त्याला गालबोट लागू नये. संयुक्त प्रयत्नातून नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे.
- डॉ. नितीन राऊत, पालमंत्री

कंपन्या मिहानमध्ये आणण्यासाठी आराखडा तयार करा

भारत बायोटेक प्रकल्प नागपुरात मिहानमध्ये यावा तसेच नागपुरात फार्मा कंपनी आणण्यासाठी ठोस कृती आराखडा एक आठवड्यात सादर करावा, एअर लिक्विड फ्रांस ही कंपनी नागपुरात १०० मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट टाकण्यास इच्छुक आहे. तातडीने त्यांच्या समवेत चर्चा करून पुढील रोड मॅप निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी विभागीय आयुक्तांना दिल्या.

महत्त्वाचे निर्णय

  • खाजगी लॅब, आरटीपीसीआर, सीबीसी, सीआरपी, डी-डायमर, एलएफटी, केएफटी, एचआरसीटी तपासणीचे वेगवेगळे दर आकारत आहेत. याची चौकशी करा

  • खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या आरोग्याची माहिती दररोज मोबाईलवर देणारी यंत्रणा विकसित करा

  • मेडिकलमध्ये पॅथॉलोजी नमुने तपासणीसाठी बाहेर पाठविण्याच्या तक्रारीबाबत मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा.

(Form a committee to examine bills in private hospitals)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT