Found more 7 Corona positive in Nagpur 
नागपूर

ये शहर है कोरो'ना' का... इवली-इवलीशी मुले होताहेत बाधित; तीन दिवसांत २5 रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणुमुळे नागपूर हॉट स्पाट ठरले आहे. रविवारी 12 व सोमवारी आठ जणांना कोरोना बाधा झाल्याचे मेडिकल, मेयो आणि एम्सच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून पुढे आले होते. यात मंगळवारी आणखी सात जणांची वाढ झाली आहे. शहरात एकूण बाधितांची संख्या 88 झाली आहे. आतापर्यंत 40 कोरोनाबाधित पहिल्या कोरोना मृताच्या संपर्कातील असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. इवली-इवलीशी मुले बाधित होत असल्याने प्रशासन हादरले आहे. त्यामुळे पुणे मुंबईच्या धर्तीवर संचारबंदी अधिक कडक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 

सोमवारी कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी तिघे आमदार निवास तर दोघे लोणारा येथे विलगीकरणात होते. मात्र, एकाला मेडिकलच्या वॉर्डात "सारी' आजारासाठी भरती करण्यात आले. कोरोना संशयीत म्हणून उपचार सुरू होते. यामुळे संशयित वॉर्डातील रुग्णांना कोरोनाचे भय निर्माण झाले आहे. हे सर्व सतरंजीपुरा येथे दगावलेल्या रुग्णाच्या संपर्कातील असल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांपैकी चौघे रवी भवन तर तिघे वनामती येथील रहिवासी आहेत. यांचा अहवाल मेयो-मेडिकलमधून प्राप्त झाला आहे.

नागपूरमधील सतरंजी भागात वास्तव्यास असणाऱ्या 68 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे पाच एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर तपासणी केली असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाले होते. सुरुवातील न्यूमोनिया झाल्याची तक्रार असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. परंतु, कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत 40 हून जास्त जणांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आढळून आलेल्या नवीन कोरोनाग्रस्तांना गाठत त्यांना विलगीकरणात घेण्यापूर्वी ते कुणाच्या संपर्कात आले, त्याची माहिती घेण्याची कारवाई सुरू केली होती. रात्री खबरदारी म्हणून या नवीन व्यक्तींनाही विलगीकरणात आणले गेले. त्यांचेही नमुने आता तपासले जाणार आहेत. 11 मार्च रोजी नागपुरात पहिला कोरोनाग्रस्त आढळला होता. आता हा आकडा आता 88 वर पोहोचला असून, यातील 12 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मेयोला हवी "सुरक्षा'

मेयोच्या कोरोना वॉर्डात सतरंजीपुरा तसेच मरकजशी संबधित रुग्णाच्या संपर्कातील सुमारे 30 कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत. काही रुग्ण डॉक्‍टर, परिचारिकांशी नाहक वाद घालत असल्याने डॉक्‍टर, परिचारिकांनी सुरक्षेची मागणी केली आहे. कोरोना वॉर्डात पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशी मागणी मेयो प्रशासनाने केली आहे. मात्र कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत असल्याने संक्रमणाचा धोका बघता पोलीसांकडून सुरक्षा कशी देता येईल, हा खरा प्रश्‍न आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT