नागपूर

नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

सकाळ वृत्तसेवा

सावनेर (जि. नागपूर) : तालुक्‍यातील वाकी गावालगत असलेले निसर्गरम्य वातावरण व द्वारका वॉटर पार्कमध्ये नागपूर येथील आठ युवक फिरायला आले होते. यापैकी चार युवकांचा कन्हान नदीच्या पात्रातील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी कन्हान नदीपात्राच्या डेंजर डोहात घडली. (Four-drowned-at-Waki-in-Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी असलेले आठ युवक पिकनिकसाठी सावनेर तालुक्यातील वाकी येथे आले होते. मात्र, येथे पोहोचल्यानंतर त्यांना द्वारका वॉटर पार्क बंद दिसले. यामुळे त्यांनी परिसरात असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात फिरायला जाण्याचे ठरवले. आठही जण गाडीने कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले.

नदीजवळ पोहोचताच आणि वाहते पाणी पाहून चौघांनी पोहायचे ठरवले. त्यानुसार आठ पैकी चार युवक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, या युवकांना पाण्याचा अंदाज लावता न आल्याने बुडू लागले. मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही. पाण्यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला.

माहिती मिळताच खापा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने चारही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. गोताखोरांना फक्त एका युवकाचा मृतदेह आढळून आला. उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते. परिसरात पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात मोठी अडचण येत आहे.

फलकाकडे दुर्लक्ष करतात

वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोलगटडोह आहे. या डोहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. याची माहिती देणारे सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहे. मात्र, येथे येणाऱ्या युवकांना पोहण्याचा मोह आवरत नसल्याने फलकाकडे दुर्लक्ष करतात आणि पाण्यात उतरतात. यामुळे अशा घटना सातत्याने घडत असतात.

(Four-drowned-at-Waki-in-Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT