bandhara accident 
नागपूर

मोठी घटना : अंगावर कोसळला मातीचा ढिगारा : चार महिलांचा मृत्यू, तीन गंभीर

सकाळवृत्तसेवा

सावनेर  (जि. नागपूर) : सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आदासा पटकाखेडी नाल्यावर सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिलांचा मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.30 वाजतादरम्यान घडली. 
वर्षा शामलाल मडावी (वय 26), अनुसयाबाई हरदेव टेकाम (वय 45), सुनीताबाई कैलास (वय 35) व रामप्यारी उदयसिंग काकोरिया (वय 18) सर्व रा. पांढरकवडा बरघाट, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश अशी मृतांची नावे आहेत. जखमी महिलांची नावे कळू शकली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे नागपूरच्या स्मॉल स्केल इरिगेशन कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे आदासा पटकाखेडी मार्गावरील नाल्यावर मागील आठ-दहा दिवसांपासून बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराने मध्यप्रदेश येथील शिवनी जिल्ह्यातील मजूर आणले होते. त्यात महिलाही होत्या. 

बंधारा कामादरम्यान घडली घटना 
महाशिवरात्रीचा दिवस असल्याने शुक्रवारी सकाळी सात वाजतापासूनच कामाला सुरुवात झाली. महिला मजुरांचे 10 फूट खोल खड्ड्यात उतरून कॉंक्रिटचे काम सुरू होते. काम सुरू असताना साडेसातच्या दरम्यान बंधाऱ्याचा ढिगारा खाली काम करीत असलेल्या महिलांच्या अंगावर पडला. यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या. 

मृतदेह परस्पर रवाना 
मृत चार महिलांपैकी तिघींचा मृतदेह शवविच्छेदन न करता इतर मजुरांसोबत शिवनी येथील त्यांच्या गावाला पाठविण्यात आला. तर एकीचा मृतदेह सावनेर येथील आरोग्य केंद्रात दाखल करून नंतर शिवनीला रवाना करण्यात आले. जखमी तीन महिलांना उपचारासाठी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. 

लपवाछपवीचा प्रयत्न 
सकाळी घटना घडल्यानंतर ठेकेदाराने सावनेर पोलिसांना सूचना देण्यासाठी बराच विलंब केला. एवढी मोठी घटना घडूनही संबंधित विभागाचे अधिकारी मौन बाळगून आहेत. तर काम करत असलेल्या मजुरांची नावेही ठेकेदाराला माहीत नसल्यामुळे प्रकरणात लपवाछपवी होत असल्याचे लक्षात येते. या कामावरील अभियंत्याला सावनेर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT