अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या खोट्या विक्रीचे बनावट देयके सादर करून सरकारी तिजोरीला तब्बल ११८.१२ कोटींचा चुना लावल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.  
नागपूर

११८ कोटींची जीएसटी चोरी; ६५६ कोटीच्या खोट्या व्यवसायाची प्रकरणे उघडकीस; चार जणांना अटक 

केतन पळसकर

नागपूर : बनावट देयक तयार करून सुमारे ११८. १२ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स घोटाळा केल्या प्रकरणी वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) विभागीय कार्यालयाने चार जणांना अटक केली. संशयित आरोपींनी ६५६.२२ कोटी रुपयांच्या कागदोपत्री व्यवहारामध्ये हा इनपुट घोटाळा केला आहे.

अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या खोट्या विक्रीचे बनावट देयके सादर करून सरकारी तिजोरीला तब्बल ११८.१२ कोटींचा चुना लावल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. या प्रकरणी डिजीजीआयच्या नागपूर विभागीय कार्यालयाने हा 'जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा' उघडकीस आणला आहे. 

विशेष म्हणजे भंडारा पासून नंदुरबारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बनावट देयकांच्या आधारे खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय आहे. जानेवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२१ या काळात घोटाळा करणाऱ्या अनेक कंपन्यांच्या म्होरक्यांना विविध ४८ कंपन्यांवर छापे टाकून चार जणांना अटक केली आहे. तसेच, यावेळी त्यांच्याकडून ७.२७ कोटी रुपये जप्त केले आहे. 

तपासादरम्यान असे दिसून आले आहे की मसाले व सुपारी, सिमेंट आणि लोखंड उत्पादनांपर्यंतच्या विविध प्रकारच्या करपात्र वस्तूंमध्ये व्यापलेल्या संस्थांच्या व्यवहारांचा यामध्ये समावेश आहे. मोठ्या संख्येने अस्तित्वात नसलेल्या किंवा बिगर व्यवसाय नसलेल्या निवासी मालमत्ता असल्याचे आढळून आले. 

या संस्थांनी व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा म्हणून जीएसटी पोर्टलवर विद्युत बिले आणि भाडे करारांसारखे बनावट आणि बनावट कागदपत्रे अपलोड केली होती. ज्या कंपन्या कार्यरत असल्याचे आढळले त्याबाबत, अधिकृत व्यक्तींच्या चौकशीत कोणतीही पुरावा न मिळाल्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी या संस्थांनी अवलंबिलेल्या फसव्या पद्धतीची पुष्टी झाली.

म्होरक्या जाळ्यात

आयटीसीपोटी मिळविलेल्या एकूण रकमेतील ७.२७ कोटींची जप्ती विभागाद्वारे करण्यात आली. तसेच चार जणांना अटक केली. हे चौघेही या रॅकेटचे मास्टरमाइंड असल्याची माहिती डीजीजीआय नागपूर झोनल युनिटचे अतिरिक्त संचालक प्रदीप गुरुमूर्ती यांनी दिली.

कारवाई दृष्टिक्षेपात

अटक केलेले आरोपी – ४
बनावट देयकांची रक्कम - ६५६.२२ कोटी
एकूण इनपुट टॅक्स क्रेडिट – ११८.१२ कोटी
जप्त केलेली रक्कम - ७.२७ कोटी

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT