Friend committed murder while giving up alcohol in Nagpur 
नागपूर

दारू पिताना मित्राने व्यक्‍त केली मनातली इच्छा; संताप अणावर झाल्याने दुसऱ्याने...

अनिल कांबळे

नागपूर : दोन मित्र... दोघेही ऑटो चालवातात... दोघांचीही गुन्हेगारी प्रार्श्‍वभूमी... त्यामुळे त्यांचे चांगले पटायचे... दोघेही एकमेकांना एकदिवसाआड दारू पाजत होते... ते दारू पिण्यासाठी बसले... दारू पित असताना एकाने दारू सोडण्याची गोष्ट केली... दारू सोडू नको या गोष्टीवरून त्यांचात वाद झाला... रागाच्या भरात एकाने दुसऱ्याच्या पोटात गुप्ती भोसकून खून केला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल शेलार व आशीष जोत हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही ऑटो चालवत असून, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे. दिवसभर ऑटो चालवल्यानंतर रात्री दोघेही मिळून दारू पित होते. एकदिवस अमोर तर एकदिवस आशीष एकमेकांना दारू पाजत होते.

दारू पीत असताना दारू सोडण्याचा विचार करणाऱ्या मित्राशी वाद होऊन दुसऱ्याच्या पोटात गुप्ती भोसकून खून केला. ही घटना बुधवारी संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वादनगर परिसरात घडली. अमोल शेलार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी आशीष जोत याला अटक केली. 

बुधवारी ऑटो चालवल्यानंतर मिळालेल्या पैशातून दोघेही आशीर्वादनगर येथील त्रिकोणी पार्कजवळ दारू पीत बसले होते. दारू पीत असताना अचानक अमोलने दारू सोडण्याचा विचार करीत असल्याचे आशीषला सांगितले. यावरून दोघांत चांगलीच चर्चा रंगली. आशीष हा अमोलला दारू न सोडण्याचा सल्ला देत होता. मात्र, अमोल निर्णयावर ठाम होता. यामुळेच त्यांच्यात चांगलाच वाद झाला.

वाद वाढल्यानंतर दोन्ही मित्रांचे स्वत:वरील नियंत्रण सुटले. दोघांनीही एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असताना आशीषने अमोलच्या पोटात गुप्ती भोसकली. यानंतर अमोल रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. चाकू भोसकल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला. परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती देऊन अमोलला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी रात्री पोहोचला ठाण्यात

दारू पित असताना दोन मित्रांचा वाद झाला. एका मित्रानी दारू सोडण्याचा विचार व्यक्‍त केल्याने हा वाद उफाळून आला होता. रागाच्या भरात मित्राने पोटात गुप्ती भोसकून पळ काढला. नागरिकांनी पोलिसांना माहिती देत जखमीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याच्या मृत्यू झाला. घटनास्थळाहून फरार झालेला आरोपी रात्री गुप्तीसह सक्करदरा पोलिस ठाण्यात हजर झाला.

हत्याकांडाचे सत्र थांबेना!

शहरातील हत्याकांडाचे सत्र थांबता थांबत नाही आहे. यावरून पोलिसांचे अपयश मात्र दिसून येत आहे. कारागृहातून सुटून आल्यानंतर काही जण पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शहरात हत्याकांडाचे सत्र सतत घडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT