The geriatric center has not yet been built 
नागपूर

'जेरियाट्रिक सेंटर' दोन वर्षांपासून कागदावरच, काय असावी कारणे... 

केवल जीवनतारे

नागपूर : उपराजधानीतील वय वर्षे 75 असलेल्या वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) 2018 मध्ये राज्यातील भाजप सरकारने 30 खाटांचे जेरियाट्रिक सेंटर तयार करण्यावर शिक्कामोर्तब केले होते. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचा हा प्रकल्प होता. यामुळे केंद्राने आधीच मंजुरी दिली होती. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांना सामंजस्य करारासाठी प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, हे सेंटर अद्याप तयार होऊ शकले नाही. 

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमाअंतर्गत (नॅशनल प्रोग्रॅम फॉर हेल्थ केअर ऑफ द एल्डरली-एनपीएचसीई) देशात आठ जेरियाट्रिक सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नागपूर मेडिकलची निवड झाली होती. नागपूरच्या केंद्रासाठी 11 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या सेंटरच्या उभारणी खर्चाच्या विभागणीत बदल झाला असून खर्चाचा 60 टक्के वाटा केंद्र शासन करणार तर 40 टक्के वाटा राज्य शासनाचा असेल असे ठरले. 

11 कोटींच्या या सेंटरमध्ये 4 कोटी 44 लाखांचा खर्च तत्कालीन भाजप-सेनेचे सरकार करणार होते. या सेंटरमध्ये आंतररुग्ण विभागाची स्वतंत्र सोय, तज्ज्ञ डॉक्‍टर, परिचारिका, अटेंडन्टसह आवश्‍यक असलेले मनुष्यबळ व साधने उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी मिळाली होती. वृद्धांसाठी स्वयंचलित खाटा, व्हेंटिलेटरसह जागतिक दर्जाची निदान व तपासणी उपकरणे खरेदी केली जाणार होती. काही महिन्यांपूर्वी हे सेंटर औरंगाबादेला पळवण्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी दै. "सकाळ'ने ही बाब प्रकाशात आणली. 

जेरियाट्रिकतज्ज्ञ डॉ. संजय बजाज यांनी हे केंद्र नागपुरात व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी भूमिका मांडली. परंतु, याचा काहीएक लाभ झाला नाही. दोन वर्षांनंतरही हे केंद्र कागदावरच आहे. सध्या वृद्धांवरील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची कमतरता आहे. मेडिकलमध्ये "रिजनल जेरियाट्रिक सेंटर' तयार होणार होते.

हा प्रकल्प वृद्धांसाठी वरदान होता. केंद्र सरकारने नागपूरच्या मेडिकलसह देशातील आठ संस्थांमध्ये प्रादेशिक वृद्ध वैद्यकीय केंद्र सुरू करण्याचे निश्‍चित केले होते. यामुळे मेडिकलमध्ये दोन पदव्युत्तर जागांची वाढ होणार होती. यासंबंधित अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 


 केंद्र उभारणीच्या खर्चाचा तपशील 

  • पायाभूत सुविधा आणि फर्निचर- 2 कोटी 
  • मनुष्यबळ- 4 कोटी 18 लाख 
  • लसीकरण व औषधांसाठी (प्रत्येकी 1 कोटी)- 2 कोटी 
  • यंत्रसामग्रीसाठी- 50 लाख 
  • प्रशिक्षणासाठी-20 लाख 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT