get 85 percent by working in the cloth shop 
नागपूर

प्रेरणादायी... दिवसभर कपड्याच्या दुकानात काम, थकून आल्यावर करायची अभ्यास, तरीही... 

मंगेश गोमासे

नागपूर : झिंगाबाई टाकळी, गणेशनगर रहिवासी समृद्धीच्या वडिलांचे 2013 मध्येच निधन झाले. डोक्‍यावरचे छत्र हरविले. त्यामुळे आईला मदत म्हणून समृद्धीनेही कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयातील शिक्षण घेतानाच समृद्धीने आत्मनिर्भर होण्यासाठी पाऊल उचलले. मात्र, तेवढ्याच गांभीर्याने अभ्यासावरही लक्ष केंद्रित केले. 

सदर येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी समृद्धी संजय तातोडने कपड्याच्या दुकानात काम करून कला-वाणिज्य शाखेतून 85 टक्के मिळविले. तिचे यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिवसभर दुकानात काम करून रात्री घरी परतल्यावर सगळा थकवा बाजूला सारून समृद्धी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची. काम आणि अभ्यास या दोन्ही बाबी तिथे अतिशय समर्थपणे सांभाळल्या. त्यामुळेच तिला एवढे मोठे यश मिळाले. 

आईने पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्हा तीन बहिणींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. सर्वांत मोठी बहीण डीएड करीत आहे. संपूर्ण घरची जबाबदारी आईवर आली. आई एका खासगी शाळेत चपराशी असून, तिला पाच हजार रुपये पगार मिळतो. आईला मदत करण्यासाठी एका कपड्याच्या दुकानात काम करावे लागले. त्यामुळे अभ्यासाला दोन ते तीन तास मिळत असे, असे समृद्धीने सांगितले. 

कुठलाही अभ्यास शिक्षक शाळेतच पूर्ण करून घेत असत. समृद्धीने महाराष्ट्र पोलिस सेवेतमध्ये दाखल होऊन देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी शाळेच्या संचालिका प्रभा चौधरी व शिक्षक सुरेश सुखदेवे यांनी समृद्धीच्या घरी जाऊन तिचा गौरव केला. 


कामवालीच्या मुलीने मिळविले 80 टक्के 


विदर्भ बुनियादी शाळेतील साक्षी खोब्रागडे या आचाऱ्याचा हाताखाली काम करणाऱ्या महिलेच्या मुलीने बारावीच्या निकालात 80 टक्‍क्‍यांसह यश मिळविले. विशेष म्हणजे शाळेत शिक्षणासाठी पैशाची अडचण असल्याने शिक्षकांनी तिच्या अभ्यासक्रमाचा खर्च उचलला होता. त्यातूनच तिने अभ्यास करीत विनाशिकवणी बारावीत यश मिळविले आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने साक्षीच्या आईने आचाऱ्याच्या हाताखाली पोळ्या करण्याचे काम करण्यास सुरुवात केली. दहावीचे शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यावर अकरावीच्या प्रवेशासाठी तिच्याकडे पैसेच नसल्याचे शिक्षकांना कळले. त्यांनी स्वत:च्या खिशातून साक्षीचे पैसे भरले. तसेच संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला. मात्र, शिक्षणाची जिद्द म्हणून बारावीत कुठल्याच शिकवणी वर्गाचा आधार न घेता, स्व:अभ्यासावर तिने एमसीव्हीसी शाखेत 80 टक्के गुण मिळविले. आता साक्षीला स्वत:च्या पायावर उभे राहून आईला मदत करायची आहे. मात्र, पैशाअभावी पुन्हा साक्षीच्या समोरच्या शिक्षणाला ब्रेक लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींकडून तिला मदतीचीही अपेक्षा आहे. 


संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

Marathi Kannad : 'मराठी घरातच बोलायची, अंगणवाडीत चालणार नाही'; कन्नड अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना सज्जड दम, नोटीस देऊन कारवाईचे आदेश

संतापजनक! 'जातिवाचक शिवीगाळ करु बार्शीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग'; कोणी नसताना घरात घुसले अन्..

SCROLL FOR NEXT