Girls from Vidarbha refuse to marry boys from Mumbai and Pune 
नागपूर

नको गं बाई... येथील मुलांसोबत आता लग्न नाही, विदर्भातील उपवर मुलींचा निश्‍चय

मनीषा मोहोड

नागपूर : चार महिन्यांपासून जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा मोठ्या शहरांमध्ये झाला आहे. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या ही मुंबई येथे आहे. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जण धास्तावले आहे. कोरोनाचा धोका सर्वांना असताना याचा सर्वाधित फटका युवकांना बसणार आहे. काय आहे हा प्रकार, वाचा... 

आयुष्याचा जोडीदार हा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातला असावा असे अनेक मुलींना वाटते. यासाठी ते आपल्या पाल्यांकडे तगादा लावतात. लग्न करणार तर मुंबई किंवा पुण्यात रहिवासी असलेल्या मुलाशी. काही मुली तिकडे शिक्षण घेऊन लग्न करून टाकतात. तर काही प्रेमप्रकरणातून मुंबई किंवा पुण्याच्या रहिवासी होतात. एकंदरीत पुणे व मुंबईत राहण्याची मोठी क्रेझ असते मुलींमध्ये... मात्र, ही क्रेझ आता कमी होताना दिसत आहे.

मुंबईसह पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस येथील रुग्णांच्या संख्येत वाढ होता. मुंबईसह पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता याबाबतची पसंती बदलत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दिर्भातील उपवर मुली मुंबई, पुण्यात राहणारा मुलगा लग्नासाठी नको गं बाई... असा निश्‍चय करू लागल्या आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मोठ्या शहरातील मुलांना आपल्या मुळ गावी परतावे लागले. अशावेळी नातेवाईकांनाही त्यांच्याकडे संशयाने पाहण्यास सुरुवात केली. कोरोना काळातील चित्र पाहता धकाधकीचे जीवन असणाऱ्या या शहरांमध्ये मुलगी का द्याययची असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

मुलांवर ओढवली संक्रांत

विदर्भातील अनेक मुलींची ऐरवी मुंबई, पुणे सारख्या शहरातील मुलांना पसंती असायची. मात्र, आता मुली देखील पालकांच्या मताशी सहमती दर्शवत शहरातील मुलांना नकार देत आहे. त्यामुळे या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या मुलांवर संक्रांत ओढविली आहे. 

गावाकडील व्यावसायिक मुलांना पसंती

मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जण धास्तावले आहे. पूर्वी नोकरदार मुलांनाच मुलींची अधिक पसंती असायची. मात्र, आता कोरोनामुळे मुलींची पसंती बदलली आहे. त्यामुळे काही मुलींनी गावाकडील व्यावसायिक व शेतकरी कुटुंबातील मुलांना पंसती दर्शविली आहे.

एनआरआय मुलांनाही ना...

विदेशातील मुलगा मिळाला म्हणजे मुलीचे नशीच उजळले असे समजले जात होते. मात्र, आता तर लग्न जुळविणाऱ्या संस्थांना स्पष्ट शब्दात सांगितले जाते की, एनआरआय मुलांची माहितीही आम्हाला देऊ नका. चार घास कमी खाईल पण पोरगी आपल्याच गावी सुखी राहील असा विचार पालकांनी केला आहे. 

मतपरिवर्तन होण्याची शक्‍यता
शहरातील मुलगा नको असे मत काही लोकांचे असू शकते. मात्र, परिस्थिती बदलली की, पुन्हा मतपरिवर्तन होईल. भविष्यात परिस्थिती बदलली की पुन्हा मुलींच्या पालकांकडून शहरातील मुलांना पसंती मिळेल असा विश्‍वास मला वाटतो. 
- रमन उपाध्याय, पुरोहित

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT