Government doctors Diwali holidays canceled
Government doctors Diwali holidays canceled 
नागपूर

शासकीय डॉक्टरांच्या दिवाळी सुट्याही रद्द, आरोग्य विद्यापीठाचे आले पत्र

केवल जीवनतारे

नागपूर  ः कोरोनाच्या आणिबाणीचा काळ लक्षात घेता राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील कोविड बाह्यरुग्ण विभाग तसेच कोरोना वॉर्डात रुग्णांची संख्या भरपूर आहे. यामुळे डॉक्‍टरांच्या उन्हाळी सुट्यांपाठोपाठ आता दिवाळीच्या सट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून तसे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना कळवण्यात आले आहे.

दरवर्षी राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षकांच्या सुट्यांचे नियोजन करण्यासाठी "फिप्टी-फिप्टी'चा फॉर्म्युला वापरला जातो. दोन टप्प्यात वैद्यकीय शिक्षकांना उन्हाळी सुटी देण्यात येते. पहिल्या टप्प्यात ५० टक्के डॉक्‍टरांना उन्हाळी सुटी देण्याचा प्रघात आहे. त्यानंतर उर्वरित ५० टक्के शिक्षक उन्हाळी रजेवर जातात. असा हा "फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला रुग्णांच्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगापासून वाचवतो. 

राज्यभरातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला 40 हजार रुग्णांची तपासणी होते. वैद्यकीय शिक्षकांसह निवासी डॉक्‍टर ओपीडीत तपासणी करतात. कोरोना संकटामुळे अंतिम वर्षाच्या निवासी डॉक्‍टरांनाही सुटी देण्यात आली नाही.

एकट्या मेडिकलचा विचार करता उन्हाळी सुट्यांच्या दोन महिन्यांच्या काळात एक लाख रुग्णांना तपासण्याचे काम ५० टक्के डॉक्‍टर करतात. राज्यभरातील मेडिकल कॉलेजमधील हीच स्थिती आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे उन्हाळी सुट्या रद्द केल्या. आता दिवाळी तोंडावर आली. दिवळीतील सुट्यांचा आनंद कुटुंबासोबत अनुभवता येईल असे डॉक्टरांना वाटत असताना या सुट्या आरोग्य विद्यापीठाने रद्द केल्या आहेत. यामुळे नाराजीचा सूर आहे.


वैद्यकीय व्यवसायाचे ब्रीद सांभाळत सेवा
कोरोनाच्या संकटामुळे मेडिकल टिचर्सच्या उन्हाळी व दिवाळी सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र कोणताही नाराजीचा सूर न काढता वैद्यकीय व्यवसायाचे ब्रीद सांभाळत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकल विभागात कार्यरत मेडिकल टिचर्स कोरोना वॉर्डात सेवा देत आहेत. मेडिकल टिचर्सच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार शासनाने करावा.
डॉ. समीर गोलावार, सचिव, महाराष्ट्र मेडिकल टिचर्स असोसिएशन, महाराष्ट्र. 

संपादन  : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT