doctor
doctor e sakal
नागपूर

लाट ओसरताच कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीला कंत्राटी आरोग्य कर्मचारी (contract basis health worker) नियुक्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या बळावरच दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना करण्यात आला. आता लाट ओसरल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येत आहे. कोरोनाबाधितांसाठी (corona cases) जीव धोक्यात घालणाऱ्या त्या फ्रन्टलाईन वर्करला वापरून फेकून देण्याचा हा प्रकार आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (government not continue contract basis health worker after second wave of corona in nagpur)

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मेयो, मेडिकलसह सर्वच आरोग्य विभागात डॉक्टर, परिचारिका, डाटा एन्ट्री ऑपरेटर,प्रयोगशाळा तंत्रज्ञांसह विविध पदे कंत्राटीवर भरण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून मिळतील ती कामे केली. मनुष्यबळाची कमतरता या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भरून काढली. कोविड केअर सेंटर (सीसीसी) डीसीएच व डीसीएससी सुरू करण्यात येऊन कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले. जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांची अहोरात्र सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा म्हणून कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर दिली. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर सीसीसी, डीसीएच व डीसीएचसी बंद केले. तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचा आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला. आता मेयो, मेडिकलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कार्यमुक्त करण्यासंदर्भात पत्र पोहोचले आहे.

तिसरी लाटेसाठी पुन्हा कंत्राटीच -

सहा ते आठ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत वैद्यकीय तज्ज्ञांनी दिले. तिसऱ्या लाटेचा लढा देण्यासाठी हेच कंत्राटीं कर्मचारी नेमण्यात येतील. तिसरी लाट ओसरल्यानंतर या कर्मचाऱ्यांना पुन्हा काढून टाकण्यात येईल, असा दुटप्पीपणा शासनाकडून राबवला जात आहे. जिल्ह्याच्या १३ तालुक्यांत दीड हजार गावांत २५ लाख नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ आरोग्य उपकेंद्र, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीचे ५८ दवाखाने आहेत. ४२३ आरोग्य विभागाचे युनिट आहेत. उपकेंद्रात डॉक्टर नाहीत. याचा ताण आरोग्य सेवकांवर वाढला आहे. शेकडो पदे रिक्त आहेत.

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात संवर्गनिहाय मंजूर व रिक्त पदे -

संवर्ग मंजूर भरलेली पदे रिक्त पदे

  • आरोग्य पर्यवेक्षक २१ १२ ९

  • आरोग्य सहायक (म.) ५० २६ २४

  • आरोग्य सहायक (पु.) ७९ ५९ २०

  • आरोग्य सेवक (म.) ३६६ २६० १०६

  • आरोग्य सेवक (पु.) १९५ १८६ ९

  • औषध निर्माण अधि. ७६ ६४ १२

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ १० ८ २

  • कृष्ठरोग तंत्रज्ञ ५ ५ ०

  • अवैद्यकीय पर्यवेक्षक १ १ ०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

SCROLL FOR NEXT