Gram Panchayat Elections Results MVA wins in Parshivni Nagpur district  
नागपूर

RSS चे समर्थक असलेल्या माहुलीत महाविकास आघाडीचा डंका; पारशिवनी तालुक्यात दहाही जागांवर विजय  

रुपेश खंडारे

पारशिवनी (जि. नागपूर) : तालुक्यातील दहाही ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. भाजपने एकही ग्रामपंचायतीत आपले अस्तित्व टिकवून ठेवले नाही. पदवीधर निवडणुकीत तालुक्यातील महाविकास आघाडीतील पक्षांना एकत्र ठेवणे शक्य झाल्यामुळेच आजचा हा विजय पहायला मिळाला, अशी भावना कार्यकत्यांत दिसून आली.

राज्याचे कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी तालुक्यातील काँग्रेसचे केदार गट, चंद्रपाल चौकसे गट, राजेंद्र मुळक गट यांच्या सर्व कार्यकत्याना ग्रामपंचायतीची निवडणूक एकत्रपणे लढण्यास सक्त ताकीद दिली होती. तसेच शिवसेना आमदार आशीष जैस्वाल गट, राष्ट्रवादी व प्रहार पक्षदेखील काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून ही निवडणूक लढले. मोजक्या ठिकाणी अपवाद वगळता जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे जिंकून आले. भाजपने फक्त खेडी, नवेगाव खैरी, निमखेडा व माहुली या ग्रामपंचायतीत बोटावर मोजण्याइतपत उमेदवारांचे खाते उघडले.

सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्मभूमी असलेल्या माहुली ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे ८ उमेदवार जिंकून आले, तर २ भाजप व एक प्रहारचा उमेदवार जिंकून आला. बाबुळवाडा ग्रामपंचायतीत सुनील केदार समर्थित इंद्रपाल गोरले गटाचे ४ काँग्रेस तर ३ उमेदवार सेनेचे निवडून येऊन येथे महाविकास आघाडीने आपला झंडा गाडला. पिपळा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सचिन आमले गट व काँग्रेसचे गौतम गजभिये गटाने ५ उमेदवार जिंकून आणले तर दोन प्रहारचे उमेदवार जिंकून आणून महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण केले. 

नवेगाव खैरी येथे केदारसमर्थक कमलाकर कोठेकर गटाचे काँग्रेस चे ६ उमेदवार जिंकून आणून आपले वर्चस्व कायम ठेवले. इथे शिवसेनेने सहकार्य केले. सुवरधरा येथे आशीष जैस्वाल समर्थक गटाने ग्रामपंचायत काबीज केली. इथे ४ सेनेचे, २ काँग्रेस व एक अन्य निवडून आले . ईटगाव येथे महाविकास आघाडीचे ६ तर अन्य 3 उमेदवार जिंकून आले .निमखेडा ग्रामपंचायतीत भाजपचा दणदणीत पराभव होऊन काँग्रेसचे ५ उमेदवार जिंकून येऊन काँग्रेसने ग्रामपंचायत ताब्यात घेतली. 

खेडी ग्रामपंचायतीत काँग्रेसने आपले ६ उमेदवार जिंकून आणून महाविकास आघाडीचा झंडा गाडला. इथे भाजपाला ३ वर थांबावे लागले. बोरी ( सिंगरदीप) येथे महाविकास आघाडी जिंकून आली .खंडाळा येथे युवक काँग्रेसचे रामटेक विधानसभा अध्यक्ष निखिल पाटील गट व शिवसेना गटाने महाविकास आघाडीचे सदस्य जिंकून आणले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT