gym
gym 
नागपूर

लॉकडाउनने बिघडवले आयुष्याचे गणित; पाचशेवर जिम व फिटनेस क्‍लब्सना बसला कोरोनाचा मार

नरेंद्र चोरे

नागपूर : गौरव केवटेने लाखो रुपये खर्च करून एक वर्षांपूर्वी नंदनवन परिसरातील दर्शन कॉलनीत पॉश जिम सुरू केला. शहरात फिटनेसचे "फॅड' वाढत चालल्याने चांगली कमाई होईल; आयुष्य आनंदात जाईल, अशी त्याला आशा होती. मात्र उद्‌घाटन होऊन जेमतेम महिना -दीड महिना लोटत नाही तोच लॉकडाउन लागला आणि सर्व आशेवर पाणी फिरले. कोरोनाचा मार बसल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. शहरातील शेकडो जिम व फिटनेस क्‍लब मालकांची जवळपास हीच स्थिती आहे.

एमबीएपर्यंत शिकलेल्या ३० वर्षीय गौरवने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्वत:जवळची थोडीफार जमापुंजी आणि कर्ज काढून "माय लाइफ फिटनेस' नावाचा जिम उघडला. थाटात उद्घाटन केले. जिम सुरू करून जेमतेम महिना लोटत नाही, तोच देशात लॉकडाउन लागला. जवळपास सात-आठ महिने बंद राहिल्यानंतर काही काळासाठी सुरू झाला. पण तो आनंद औटघटकेचाच ठरला. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा जिम कुलूपबंद झाले.

आवक आटल्यामुळे बॅंकेचे ईएमआय, किराया, इलेक्‍ट्रिक बिल, ट्रेनर्स व कर्मचाऱ्यांचा पगार, मेंटेनन्ससाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्‍न गौरवसारख्या असंख्य जिम मालकांना पडला आहे. जिम बंद असल्यामुळे केवळ मालकच आर्थिक अडचणीत नाहीत. त्यावर उदरनिर्वाह असलेले कर्मचारीही बेरोजगार झाले आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे नसल्यामुळे ते नैराश्याच्या वातावरणात आहेत. सध्याच्या घडीला शहराच्या विविध भागांत पाचशेच्या वर छोटेमोठे जिम व फिटनेस क्लब्स आहेत. कमीअधिक प्रमाणात त्यांचीही सध्या हीच अवस्था आहे.

मंत्र्यांकडे मांडल्या व्यथा

जिम ओनर्स असोसिएशनने प्रशासनाच्या निर्णयाविरोधात सोमवारी कस्तुरचंद पार्क परिसरात प्रदर्शन केले. शिवाय पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही व्यथा मांडल्या. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांनादेखील पत्र दिले. आर्थिक संकट लक्षात घेता सरकारने डिस्टन्सिंगच्या अटींवर जिमला परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT