Heavy rains in nagpur city
Heavy rains in nagpur city 
नागपूर

`तो` आला अन्‌ साऱ्यांची झोप उडवून गेला

नरेंद्र चोरे

नागपूर : हवामान विभागाने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा तंतोतंत खरा ठरला. मंगळवारी दुपारी जोरदार सरी बरसल्यानंतर रात्री वरुणराजाने अचानक उग्ररूप धारण केले. साडेदहानंतर शहरात सगळीकडेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह धो-धो बरसला. पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. पावसाच्या दणक्‍याने अनेकांची झोप उडाली.

पावसामुळे रस्त्यांसह चौकही तलाव बनले होते. अनेक भागांत कुठे गुडघ्यापर्यंत, तर कुठे मांडीपर्यंत पाणी साचले होते. त्यातून वाहने काढताना नागपूरकरांना चांगलीच कसरत करावी लागली. शहरातील नदी-नालेही दुथडी भरून वाहले. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली. 

शहरात मंगळवारी रात्री साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत तब्बल 100.8 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात 12 तासांत एवढा पाऊस पहिल्यांदाच बरसला, हे विशेष. विदर्भातील चंद्रपूर (58 मिलिमीटर), अमरावती (36.4 मिलिमीटर) व वर्धा (31.6 मिलिमीटर) जिल्ह्यांमध्येही दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्यामुळे बळीराजाही सुखावला आहे. 

अंबाझरी तलाव "ओव्हरफ्लो' 
रात्रीच्या धुवाधार पावसाने अंबाझरी तलावही वेळेपूर्वीच "ओव्हरफ्लो' झाला. गेल्या काही वर्षांत हे पहिल्यांदाच घडले. साधारणत: ऑगस्ट महिन्यात अंबाझरी तुडुंब भरून वाहतो. मात्र, यावेळी महिनाभर आधीच नागपूरकरांना "ओव्हरफ्लो'चा आनंद अनुभवायला मिळाला. तलाव "ओव्हरफ्लो' झाल्याची वार्ता पसरताच "यंगस्टर्स'सह शेकडो नागरिकांनी अंबाझरी परिसरात मोठी गर्दी केली. 

वरुणराजाची शहरावर मेहरबानी 
वरुणराजाने आतापर्यंत उपराजधानीवर चांगलीच मेहरबानी केली आहे. शहरात 1 जून ते 15 जुलैपर्यंत तब्बल 510 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक पाऊस नागपुरातच झाला. त्या तुलनेत ग्रामीण भागांत किंचित कमी पाऊस पडला.

मुसळधार पावसाचा इशारा 

दणक्‍यात पाऊस पडत नाही, अशी ओरड असतानाच तो आला आणि साऱ्यांची झोप उडवून गेला. मंगळवारी रात्री तसेच बुधवारी दिवसभर बरसलेल्या धुवाधार पावसाने अख्खे शहर पाणी पाणी केले. अवघ्या 12 तासांत तब्बल 100 मिलिमीटर पाऊस कोसळला. गुरुवारी आणि शुक्रवारीही विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  

मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या "सायक्‍लॉनिक सर्क्‍युलेशन'मुळे सध्या विदर्भावर ढगांची दाटी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. एक-दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीही होऊ शकते.
-एम. एल. साहू, संचालक, प्रादेशिक हवामान विभाग. 

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT