high alert in nagpur on occasion of republic day 
नागपूर

नागपुरात 'हायअलर्ट'; कडक पोलिस बंदोबस्तात संशयितांवर नजर, तर सीमाही केल्या सील

राजेश रामपूरकर

नागपूर : गणतंत्रदिन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शहरात आगमन या पाश्वभूमीवर गुप्तचर विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील बंदोबस्तासंदर्भात पोलिस आयुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक घेत होते. त्यात हाय अलर्ट लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. यामुळे शहरात येणाऱ्या सर्वच सीमा पोलिसांनी 'सील' केल्या आहेत. 

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रविरोधी कारवायांच्या शक्‍यतेमुळे इंटेलिजेंट ब्युरो `हायअलर्ट' जाहीर करीत असते. त्यामुळे रेल्वे स्टेशन, विमानतळ, संघ मुख्यालय, दीक्षाभूमी या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. सीमेबाहेरून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केल्या जात आहे. वाहतूक शाखेतील ४५० पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण दोन हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. शहरात संवेदनशिल ठिकाणी तीन बॉम्बशोधक व नाशक पथक मागमूस घेत आहेत. रेल्वेस्टेशन येथील सुरक्षा व्यवस्थेत जीआरपी आणि आरपीएफने खूप वाढ केली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्‍तांनी दिली. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येलाच पोलिस आयुक्‍तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना त्यांच्या जागा नेमून देण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताकदिनाचा आनंद साजरा करताना तरुणाईने कोणत्याही प्रकारचा उन्माद करू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाच्या नावावरूनही काही संघटनांकडून विरोध केल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवरही त्या परिसरातही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. 

प्रजासत्ताकदिनाच्या नागपूरकरांना शुभेच्छा. युवा वर्गाने गणराज्य दिन साजरा करताना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घ्यावी. बंदोबस्तासाठी पोलिस सज्ज आहेत. काही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्‍ती आढळल्यास पोलिसांना कळवा. 
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Elections : निवडणुकीआधीच वंचितने काँग्रेसचा गेम कसा केला? जागा आहेत, पण उमेदवार नाहीत… आता काय?

Viral Video: हत्तीचा ‘परफेक्ट हेअर फ्लिप’ क्षण कॅमेऱ्यात कैद! व्हिडिओ पाहून हसून लोटपोट व्हाल

Nashik Municipal Election : नाशिक भाजपमध्ये 'एबी' फॉर्मचा राडा; विल्होळीत कार्यकर्त्यांचा उद्रेक, तोडफोड आणि पाठलाग!

चक्क पाण्यावर चालणार सायकल! 'इंजिनिअर अरविंद देठेंचा नाविन्यपूर्ण उपक्रम, सायकल चालवून वेगळाच आनंद लुटता येणार..

Latest Marathi News Update : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर वॉर

SCROLL FOR NEXT