कोरोना 
नागपूर

१० कोटींची इस्पितळाची जंबो इमारत बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर धुळखात; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः शहरापासून अवघ्या १४ किलोमीटरर अंतरावर असलेल्या सालई गोधनी येथे तीन वर्षांपासून पाच एकर जागेत उभारलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तेथील बेड्‍स, ऑक्सिजन सिलिंडर तसेच सुसज्ज उपकरणे धुळखात पडली आहेत. याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित करण्यात यावी आणि तोबडतोब कोविड रुग्णांसाठी या केंद्राचा वापर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्‍रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी केली.

या आरोग्य केंद्रात औषध भांडार गृह, शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता कक्ष, पुरुष विभाग, स्त्री विभाग, नोंदणी कक्ष यासारख्या सुसज्जित व्यवस्था उपलब्ध आहेत. परिसरातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची वसाहती येथे निर्माण करण्यात आली. सुमारे १० कोटी रुपये खर्च करून हे

बांधकाम २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आले.

आतमध्ये पहाणी केल्यावर नवीन बेड्‍स, ऑक्सिजनचे सिलेंडर आणि बरीच आरोग्य यंत्रणेची सामुग्री धूळखात पडलेली आहेत. शासनाने मनावर घेतल्यास सालई गोधणीच्या या आरोग्य केंद्रा अवघ्या दोन दिवसात एक प्रशस्त कोविड हॉस्पिटल सुरु केले जाऊ शकते परंतु प्रशासनाने नागरिकांना मृत्यूच्या दारात सोडून दिल्यासारखे चित्र समोर येते आहे.

आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊनही ते सुरू केले जात नाही यास जबादार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. सालई गोधनी येथे पूर्णपणे विकसित आरोग्य केंद्रात लवकरात लवकर कोविड इस्पितळ सुरू करण्यासाठी निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात येणार आहे. याची दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकार परिषदेत अनिल अहीरकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT