Huge losses to farmers due to heavy rains
Huge losses to farmers due to heavy rains 
नागपूर

मन झाल हळव; हसत-खेळत सोयाबीन पेरली, चांगला पाऊसही झाला, स्वप्नही रंगवले, मात्र...

नीलेश डोये

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका... गाव वडगाव... येथील रहिवासी अरुण बावणे... जीवनाचा गाडा शेतीवरच... स्वतःची शेत नसल्याने ते ठेक्याने शेती करतात... गावालगत असलेल्या बेला गावाजवळील तीन एकर शेती ठेक्याने घेतली... तिन्ही एकर शेतीत सोयाबीनचे पीक घेतले... चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती... परंतु, जास्त झालेल्या पावसाने पाणी फेरले... संपूर्ण सोयाबीनच हातातून गेले... हासत खेळत जी सोयाबीन पेरली तिनेच रडकुंडी आणले...

बावणे यांच्या घरी पाच जण आहे. जीवनाचा गाडा शेतीवरच चालतो. तोही ठेक्याने घेतलेल्या. गेल्या वर्षीचा कापसाचा अनुभव पाहता बावणे यांनी मोठ्या आशेने हसत खेळत सोयाबीन पेरली. पण, आता तेच सोयाबीन त्यांना रडवत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनमधून पैसे मिळणार नसल्याने आता दुसरा काही तरी पर्याय त्यांना शोधावा लागणार आहे.

लगतच्या शेतातील स्थितीही तिचं आहे. यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ असून सव्वा लाखाच्या घरात आहे. ही परिस्थिती फक्त अरुण बावणे यांचीच नाही, तर सोयाबीनच पीक घेणाऱ्या ८० टक्के शेतकऱ्यांची असल्याचे सांगण्यात येते.

पुरामुळेही शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी यंदाही संकटातच सापडला आहे. गेल्या पाच-सात वर्षांत शेतीचे नुकसान झाले आहे. यंदा प्रथम चांगला पाऊस झाला. नंतरच्या मात्र अतिपावसाने नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे.

कचरा झाला; यावर्षीच गेल
तीन एकर शेती ठेक्याने घेतली. वखरण आणि पेरणी केली. तसेच बियाणे घेतली. सोयाबीन चांगली होण्यासाठी फवारणी केली. यावर १२ ते १५ हजारांचा खर्च झाला. काट कसर आणि मोडतोड करून पैसा उभा केला. चांगले उत्पादन होईल, अस वाटल होत. पण सोयाबीनच पिवळी पडली. हातात काहीच येणार नाही. कचरा झाला. यावर्षीच गेलं. ठेक्यानं शेती घेतली आहे. त्याची व्यवस्था करावी करावी लागणार आहे.
- अरुण बावणे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

SCROLL FOR NEXT