Hunting of tiger and 2 Calves in Umred Karhandla national Park Nagpur
Hunting of tiger and 2 Calves in Umred Karhandla national Park Nagpur  
नागपूर

ब्रेकिंग : वाघिणीसह दोन बछड्याची शिकार; उमरेड-कऱ्हांडला- पवनी अभयारण्यातील घटना

राजेश रामपूरकर

नागपूर ः व्याघ्र अभ्यासक आणि वन्यजीव प्रेमींसाठी नवीन वर्ष दुःखद बातमी घेऊन आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उमरेड-कऱ्हाडला- पवनी अभयारण्यात वाघिणीसह (सी ३) दोन बछड्याची शिकार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून एका शेतकऱ्यांच्या गाईवर वाघिणीने हल्ला करून ठार मारल्यामुळे त्याने चिडून गाईच्या शरीरावर विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

उमरेड-कऱ्हाडला- पवनी अभयारण्य वाघाच्या दर्शनासाठी ओळखले जाते. त्यामुळे पर्यटकांची गर्दी कायम या अभयारण्यात असते. आज मार्गदर्शकांनी मागण्यासाठी बंद पुकारल्याने त्यांच्याशिवाय पर्यटकांना भ्रमंती करावी लागली. दरम्यान, सायंकाळच्या दरम्यान, या अभयारण्यातील कऱ्हाडला बीट मध्ये एका वाघिणीसह दोन बछड्याचा मृत्यू झाल्याचे वनरक्षकाला गस्त करीत असताना उघडकीस आली. 

त्याने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देतात वन परिक्षेत्र अधिकारी, विभागीय वनाधिकारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा घटनास्थळाच्या शेजारील काही अंतरावर वाघिणीने एका गाईची शिकार केल्याचे लक्षात आले.

या परिसरात पाळीव प्राण्यांना चराईसाठी बंद असताना पाळीव प्राणी परिसरात आल्याने वाघिणीची शिकार झाल्याचा संशय झाल्याचे शक्यता आहे. गाईची शिकार केल्यामुळे चिडलेल्या व्यक्तींनी त्या गाईच्या शरीरावर विष टाकले. विष टाकलेले मास वाघीण आणि बछड्याने खाल्याने मृत्यू झाल्या अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दिवाकर नागोकर या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

वाघिणींचा मृत्यू कसा झाला आणि शिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पातील डॉग स्कॉडला बोलविण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी करण्यात येत असून अधिक शोध घेण्यात येत आहे. याबाबत बोलताना पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर म्हणाले, वाघिणीची शिकार विष टाकून करण्यात आलेली आहे. एक जणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. उद्या शनिवारी शवविच्छेदन करण्यात येईल.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT