नागपूर

आमचा वाली कोण? आइस फ्रूट, सरबत विक्रेते हतबल; उपचारासाठी पैसे नाहीत

योगेश बरवड

नागपूर : रस्त्यावर फिरून आइस फ्रूट, सरबत विकणारे, भंगार खरेदी करणाऱ्यांनी कोरोनाच्या (coronavirus) पहिल्या लाटेनंतर कसाबसा संसार सावरला. दुसऱ्या लाटेने तर अगदी होत्याचे नव्हते केले. त्यात यावेळी किराणा, धान्य, जेवण वाटप करणारे कुणीही फिरकत नाही. दोन वेळ कसेबसे पोटाची खळगी भरते. पण, उपचारासाठी दमडीही जवळ नाही. (No money for treatment) शासनाने दुर्बल घटकांना मदत देऊ केली. पण, कुठेच नोंदणी नसल्याने ती मदतही नाही. आम्ही या देशाचे नागरिकच नाहीत का?, अशी अगतिकता अत्यल्प उत्पन्न गटातील छोट्या विक्रेत्यांना मांडली. (Ice fruit and syrup sellers sad becose of corona virus)

मनीराम बैस मूळचा गोंदियाचा राहणारा. हाताला काम मिळावे म्हणून तो नागपुरात आला. नशिबानेच त्याला आइस फ्रूट विक्रीच्या व्यवसायात आणले. दिवसभर हातगाडी दामटून हाती पडणारी मिळकत कमी असली, तरी झोपडीवजा खुराड्यातच सुखाने संसार सुरू होता. गत मार्चमध्ये लॉकडाउन लागले. त्यावेळी किराणा, धान्य, जेवण वाटपासाठी अनेक संघटना पुढे आल्या होत्या. त्या बळावर कुटुंब जगवले. गाठीशी असणारी दमडीही गरजा भागविण्यातच खर्च झाली.

दुसऱ्या लाटेने तर सारेच वाटोळे केले आहे. कुणाची मदत नाही. रेशन कार्ड गावाकडचे आहे. यामुळे धान्यही मिळत नाही. सारेच अडचणीत असल्याने कुणी उधारही देत नाही. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न बिकट असला तरी तो कसाबसा सुटतोच. सुदैवाने आजारपणापासून लांब आहोत. पण, तो ओढवलाच तर काय करायचे, हा प्रश्नच आहे. मायबाप सरकारने आम्हालाही देश, राज्याचे नागरिक समजून मदत द्यावी, अशी अपेश्रा मनीरामने व्यक्त केली.

मजुरी काम करणारा हर्ष कावळेला नियतीनेच सरबत विक्रीकडे वळविले. उन्हाळ्यात सरबत, तर इतर वेळी ‘बुढी के बाल’ विकतो. हाती पडणाऱ्या पैशातून तो आई-वडिलांना अधून धून पैसे पाठवायचा. पण, गेल्या वर्षीपासून तोच आर्थिक तंगीचा सामना करीत आहे. आई-वडिलांना निकड असली तरी ते पैशांची मागणी करीत नाहीत. घरची स्थिती माहीत असल्यानेच लॉकडाउन लागूनही गावी परतणे टाळले. येथेच ओळखीच्या मंडळींच्या मदतीने कसेबसे दिवस ढकलतो आहे.

आमचे दुःख दूर करा

सारे आकाशच फाटले आहे. आता सरकारनेच आमचे दुःख बघून जगण्याचे बळ द्यावे, अशी भावना त्याने व्यक्त केली. मनीराम, हर्ष ही दोन्ही प्रातिनिधिक उदाहरणे असली तरी त्यांच्यासारख्या हजारो अत्यल्प उत्पन्न गटातील व्यावसायिकांची परिस्थिती सारखीच आहे.

(Ice fruit and syrup sellers sad becose of corona virus)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT