Ajit pawar
Ajit pawar Sakal
नागपूर

Ajit Pawar : इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठविण्यासाठी दिल्लीला जाऊ - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : कांदानिर्यात, उसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पीयूष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल. उद्याच आपण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत, गरज पडल्यास दिल्लीला जाऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत दिले.

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्र्यांनी उपरोक्त उत्तर दिले. दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन अवकाळी पाऊस, मराठा आरक्षणासह सर्व मुद्यांवर सभागृहात चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणाही यावेळी पवार यांनी सभागृहात केली.

विधानसभेत विरोधी पक्षांकडून मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर सदस्यांना आश्वासित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अवकाळी पाऊस, दूध, संत्रा, कापूस, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात येईल.

उसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे.

दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना वेळेअभावी बैठक घेणे शक्य नसल्यास, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह येत्या मंगळवारी बैठक घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहाला दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20 World Cup Anthem : आयसीसीने टी 20 वर्ल्डकपचे नवे अँथम साँग केले प्रसिद्ध; ग्रॅमी पुरस्कार प्राप्त बाल्फेंची आहे निर्मिती

Jalgaon Crime News : सराफ बाजार दरोडा! तिघांना 7 दिवस कोठडी; दोघा भावंडांनाही अटक

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Dombivli MIDC Blast : आचारसंहिता होती अन्यथा...डोबिंवलीतील MIDC हलवण्याबाबत उद्योगमंत्र्यांचं मोठं विधान

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार

SCROLL FOR NEXT