Illegal sale of masks in Nagpur city 
नागपूर

अचानक वाढली मास्कची विक्री, 'कोरोना'च नव्हे तर याची वाटतेय नागरिकांना भीती!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे देश लॉकडाउन झाले आहे. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेचे दुकान सुरू आहेत. घराबाहेर निघताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाकाही सुरू केला आहे. एकीकडे कोरोनाची भीती दुसरीकडे मास्क न घातल्यास पोलिसाच्या कारवाईची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे अचानक मास्कची विक्री वाढली आहे. 

मास्क वापरण्याची सक्‍ती शासनाने केली आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून हा नियम पाळणे सर्वांना गरजेचे होते. मात्र, अनेक जण मास्कचा वापर न करताच घराबाहेर पडत असल्याचे लक्षात येताच एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. मास्क न वापरण्याचा राज्यातील पहिला गुन्हा नागपुरातील एमआयडीसी ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनसह संचारबंदी कायदाही लागू करण्यात आला आहे. मात्र, अनेक जण या कायद्यांचे वारंवार उल्लंघन करून पोलिसांची डोकेदुखी वाढवित आहेत. 

पोलिस मास्क न वापरणाऱ्यांना ताब्यात घेत असल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. त्यामुळे केवळ एमआयडीसीच नव्हे तर शहरभरात अनेकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली. याचा गैरफायदा घेत चढ्या दराने मास्कची विक्री केली जात आहे. 15 ते 16 रुपयांचे मास्त 45 ते 50 रुपयांत ग्राहकांना विकले जात आहे. आगीच रोजगार नसलेल्या नागरिकांची लूट होत आहे. 

यामुळेच चढ्या दराने मास्कची विक्री कराल तर... खबरदार! असा इशाराच नागपूर गुन्हे शाखेने मास्क विक्रेत्यांना दिला आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या पथकाने देवनगर चौकातील श्रीकृष्ण सुपर बाजार येथे छापा टाकला. या बाजारातून सॅनिटायझर अधिक दराने विकले जात असल्याचे निदर्शनास आले. गुन्हे शाखा पोलिसांनी सावरकरनगर चौकातील मान मेडिकल स्टोअर्समध्ये धाड टाकली. या स्टोअर्समधून 16 रुपये किमतीचे मास्क 45 रुपयांना नागरिकांना विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले. 

मास्क व सॅनिटायझर जप्त

कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर अचानक मास्कची मागणी वाढली. याचा गैरफायदा घेत शेकडो मेडिकल स्टोअर्स संचालकांनी मास्कची चढ्या दराने विक्री सुरू केली. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स व मास्क विक्रेत्यांवर छापे टाकून मास्क व सॅनिटायझर जप्त केले.

कोराडीतही दोन स्टोअर्सवर छाप

गुन्हे शाखा पोलिसांनी कोराडीतील शिवाजीनगर येथील दुर्गा मेडिकल स्टोअर्स व शर्मा मेडिकल स्टोअर्समध्ये छापे टाकले. या दोन्ही दुकानांमध्ये मास्क 25 रुपयांमध्ये विकण्यात येत होते. अधिक दराने मास्कची विक्री करणाऱ्या दुकानदारांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT