नागपूर

शांत झाला रे कोरोना! नागपूर शहरात ५ तर ग्रामीणमध्ये फक्त ३ मृत्यू

केवल जीवनतारे

नागपूर : एक मे २०२१ रोजी जिल्ह्यात ६ हजार ५७६ कोरोनाबाधित (Corona patient) आढळले होते. त्याच तुलनेत ९९ मृत्यू झाले होते. मात्र, ३० दिवसानंतर ३० मे रोजी अवघे ३५७ कोरोनाबाधित आढळले असून अवघ्या १३ जणांचा मृत्यू झाला. यात ५ जण हे विविध जिल्ह्यातून रेफर झालेले मृत्यू आहेत. नागपूर शहरात ५ तर ग्रामीण भागात ९ असे ८ मृत्यू नागपूर जिल्ह्यात नोंदवले आहेत. यावरून कोरोनाची दुसरी लाट शांत (Corona's second wave calmed down) झाली आहे. परंतु, तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानेच कोविड हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी आयसीयूपासून तर ऑक्सिजनखाटा उभारण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहे. (In Nagpur district only 1 thousand 916 corona patient admit in hospital)

नागपूर जिल्ह्यात मार्च आणि एप्रिलमध्ये तांडव घालणाऱ्या मेडिकलसह विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या ८ हजार ८९० होती. तर ७५ हजार एकूण कोरोनाबाधित जिल्ह्यात होते. मात्र, आज परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही रुग्णसंख्येचा जोर ओसरला असून, एकूण चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालांची संख्याही घटली आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ७८१ असून यातील मेडिकल, मेयो, एम्स तसेच इतर कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९१६ आहे. ८० टक्के कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे पॉझिटिव्हीटी दर केवळ अडीच टक्क्यांच्या घरात आहे.

जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व वेळीच बाधिताची ओळख पटवून त्याला औषधोपचार देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाल्याने बाधितांसोबत मृतांच्यासंख्येत घट झाली. शहरात १० हजार ३९१ तर ग्रामीणमध्ये ३ हजार ६४६ अशा १४ हजार ३७ चाचण्या झाल्या असून २.५५ टक्के म्हणजेच ३५७ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यात शहरातील २२० कोरोनाबाधित आहेत. तर ग्रामीण भागातील १३२ व जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ७४ लाख २८६ झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ८ हजार ८९२ वर पोहोचली आहे. १,३६८ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. रविवारी शहरातून ५६७ तर ग्रामीणमधून ४७४ असे १०४१ जण बरे होऊन घरी परतलेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची एकूण संख्या ४ लाख ५८ हजार ६१३ वर गेली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७० टक्क्यांवर पोहोचले आहे.

गृहविलगीकरणात साडेचार हजार रुग्ण

सध्यस्थितीत शहरात ४ हजार ०७३ व ग्रामीणमध्ये २ हजार ७०८ असे केवळ ६ हजार ७८१ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ४ हजार ५०८ जणांना कुठलेही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणे असलेले १ हजार ९९६ रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ओसरली आहे. तर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये तब्बल ६ हजार १८२ वर खाटा रिकाम्या पडल्या आहेत.

१ मे

- कोरोनाबाधित - ६,५७६

- कोरोना मृत्यू - ९९

३० मे

- कोरोनाबाधित - ३५७

- कोरोना मृत्यू - १३

(In Nagpur district only 1 thousand 916 corona patient admit in hospital)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT