Incidents of theft increasing in Nagpur
Incidents of theft increasing in Nagpur  
नागपूर

नागपूरकरांनो सावधान! शहरात चोरट्यांचा हैदोस; घरफोडीच्या तब्बल चार घटना

योगेश बरवड

नागपूर ः उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरूच आहे. मानकापूर, कपीलनगर, अजनी हद्दीत चोरी व घरफोडीच्या चार नव्या घटना उघडकीस आल्या आहेत.

मानकापूर हद्दीतील रोज कॉलनी, श्याम लॉनजवळील रहिवासी नाजीम अली नईम अली (४५) हो १९ फेब्रुवारीला सकाळी घराला कुलूप लावून परिवारासह मुंबईला गेले होते. अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि. बेडरुममधून सोन्याचे दागिने, डुप्लिकेट चावीचा गुच्छा व २०हजार रुपये रोख असा १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. 

कपीलनगर हद्दीतील चैतन्यनगर, भारत गॅस गोडाऊनजवळ, नारी रोड येथील रहिवासी रोमील तोतडे (३४) हे बुधवारी रात्री११.३० च्या सुमारास घराच्या मुख्य दाराला कुलूप लावून परिवारासह हैदराबादला गेले होते. चोरट्याने संधी साधली, मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील अलमारीतील सोन्याची चेन, लॉकेट व मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

अजनीत राहणाऱ्या संजना बेंगुलकर (५५) या १२ फेब्रुवारीला कामानिमित्त नयन सोसायटी, आनंदनगर नकाक, कोपरी ठाणे येथे राहणाऱ्या आतेबहिणीकडे गेल्या होत्या. गुरुवारी त्या नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या असता बॅगची पाहणी केली. त्यावेळी ६ हजार रुपये रोख आणि दागिने असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले. 

खसाळा नाका येथील रहिवासी संतोषकुमार पांडे (४५) यांचे खसाळा रोड येथे पांडे ट्रेडिंग नावाने प्रतिष्ठान आहे. गुरुवारी दुपारी २.४० वाजताच्या सुमारात आपल्या मुलीला दुकानात बसवून ते कामानिमित्त बर्डीला गेले. त्याच सुमारास दोन महिला व दोन पुरुष प्रतिष्ठानात आले आणि टायर दाखविण्यास सांगितले. मुलगी टायर आणण्यासाठी दुसऱ्या रुममध्ये गेली असता चोरट्यांनी काउंटरमधील २ हजार ४२० रुपये व काउंटरच्या बाजूची ५० लाखांची रोख असलेली पिशवी असा एकूण ५२ हजार ४२ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. संबंधित पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT