Nagpur corona Update
Nagpur corona Update sakal
नागपूर

नागपूर ग्रामीण भागात कोरोना बळींच्या संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील चोवीस तासांत ९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे. काल, १० मृत्यूची नोंद झालेल्या शहरात आज एका मृत्यूची नोंद करण्यात आली. ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांतील बळीची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात नवे ३ हजार ३१० बाधित आढळून आले. गुरुवारच्या तुलनेत आज बाधितांच्या संख्येत ४३९ जणांची भर पडली.

कोरोना बाधित व बळींचा आलेख दररोज कमी अधिक होत आहे. दररोज शहरात बळींची संख्या दिसून आली. परंतु आज गेल्या चोविस तासांत ग्रामीण भागात ५ बळींची नोंद करण्यात आली तर शहरात एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. अलिकडे ग्रामीण भागात १ किंवा २ सर्वाधिक बळी नोंदविण्यात आले होते. आज प्रथमच पाच बळींची नोंद झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाही हादरली. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात १० हजार २१२ बळींची नोंद करण्यात आली. यात सर्वाधित ५ हजार ९५६ शहरातील असून ग्रामीण भागात २ हजार ६१३ मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आज ३ हजार ३१० बाधितांची नोंद करण्यात आली. गुरुवार जिल्ह्यात २ हजार ८७१ बाधित नोंदविण्यात आले होते. आज शहरात २०५४ तर ग्रामीण भागात १ हजार ११५ बाधितांची नोंद झाली. जिल्ह्याबाहेरील १४१ जण बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५ लाख ५३ हजार ४७० पर्यंत पोहोचली.

साडेचार हजारांवर बाधित कोरोनामुक्त

गेल्या दोन दिवसांपासून बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक दिसून आली. मागील चोविस तासांत ४ हजार ५८३ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ६१ हजार १३८ जणांनी कोरोनातून सावरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT