Interesting history of Variety Chowk at Nagpur 
नागपूर

#SundaySpecial : नमस्कार, मी व्हेरायटी चौक बोलतोय...

राघवेंद्र टोकेकर

नागपूर : व्हेरायटी चौकाची तऱ्हाच वेगळी आहे. शहरातील मध्यस्थानी असल्याने हा चौक कायमच गजबजलेला असतो. राजकीय हालचालींच्या पटलावर देखील हा चौक केंद्रस्थानी राहीला. येथे कधी धरणे आंदोलनाचा आवाज धुमला तर कधी हा चौक फेरीवाल्यांच्या भाऊगर्दीने फुलला. आता बघा ना... शहरात महात्माजींचे इतके पुतळे असताना आंदोलनासाठी आपसुकच याच स्थानाची निवड होते. हीच येथील व्हेरायटी म्हणता येईल. 

टाळेबंदीच्या काळात शहरात शांतता असताना व्हेरायटी चौकही शांत राहणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. स्वातंत्र्य संग्रामात येथूनच इंग्रजांना मांजरसेनेने "चले जाओ'चे नारे ऐकविले होते. त्यामुळे ही धरणे आंदोलनाची परंपरा नागपूरकरांनी कोरोनाच्या जीवघेण्या संकटातही खंडित होऊ दिली नाही हे या वर्तुळांनी सिद्ध केले आहे.

व्हेरायटी चौक नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. तरीही गुगलवर चौकाचा इतिहास सर्च केल्यास धरणे आंदोलनाचे तपशीलच प्रथमत: दृष्टीक्षेपास पडतात. "साहेब' बांधकाम मंत्री असताना शहीद गोवारी पूल पूर्णत्वास आला. यावेळी अडथळा ठरलेल्या महात्माजींच्या पुतळ्याला बाजूला सरकविण्यात आले.

तेव्हापासून हा चबुतरा धरणे आंदोलनाचा आधारस्तंभ झाला. अनेक निराधारांना हक्‍क मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या व्हेरायटी चौकाने असंख्य नवोदितांचे करिअर घडविले आहे. महात्माजींची जयंती असो, पुण्यतिथी असो वा श्रीराम नवमीची शोभायात्रा व्हेरायटी चौकातील महात्माजींच्या पुतळ्याला महापालिकेतर्फे मंगलस्थान घालण्यात येते.

इतरवेळी आंदोलनतर्के पुतळ्याकडे पाठ करून हक्‍कासाठी लढतात. कोरोनाच्या संकटाने माणसाच्या जगण्याची रित बदलवली आहे. त्यामुळे आगामी काळात धरणे, आंदोलन करण्याची पद्धतही बदलणार यात शंका नाही. अशात महात्माजींच्या पुतळ्याभोवती असे वर्तुळ कायम स्वरूपी बनवून घ्यावे लागणार इतके निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! २९ महापालिकांचं बिगुल आज वाजणार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

IPL 2026 Auction live : ७७ खेळाडूंचं नशीब बदलणार, २३७.५५ कोटींचा पाऊस पडणार... ऑक्शन केव्हा, कुठे व किती वाजता होणार; जाणून घ्या सर्व माहिती

New Year 2026 Trip Idea: नवीन वर्षाची सुरूवात करा हटके पद्धतीने! गर्दीपासून दूर असलेली भारतातील ‘ही’ ठिकाणे एकदा पाहाच

EPFO Provident Fund : घरबसल्या 1 मिनिटात तपासा आपला PF बॅलन्स! जाणून घ्या EPFO पासबुक पाहण्याचे सोपे, जलद मार्ग आणि नवीन सुविधा

जनावरांच्या बाजारात रिपोर्टिंग करत होती पत्रकार, बैलानं अचानक केला हल्ला; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT