jagdish khare save girl who drowning in gandhisagar lake nagpur 
नागपूर

खोल पाण्याकडे पाहत घुटमळत होती तरुणी, काही क्षणातच घडलेल्या प्रसंगाने उपस्थितही चक्रावले

अनिल कांबळे

नागपूर : मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आठची वेळ...२० वर्षीय तरुणी गांधीसागर तलाव परिसरात आली. ती काही वेळपर्यंत घुटमळत होती. खोल पाण्याकडे पाहत होती. तिच्या हालचालींकडे जगदीश खरेंची नजर गेली. तिचा हेतू लक्षात येताच हालचालींकडे जगदीश यांनी लक्ष ठेवले. काही क्षणातच तिने तलावात उडी घेतली. जगदीश यांनी लगेच तिच्या पाठोपाठ पाण्यात उडी घेतली आणि तिचे प्राण वाचवले. तिला पाण्याबाहेर काढले. नागरिकांनी गर्दी केली. गणेशपेठ पोलिस आले.  त्यांनी तरुणीला ताब्यात घेतले. तिची समजूत घातली. तिच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तरुणीला नातेवाईकाच्या ताब्यात दिले. ही चित्रपटाला शोभेल अशी घटना नागपुरात घडली. 

पोलिस आणि तरुणीच्या नातेवाइकांनी जगदीश खरे यांचे आभार मानले. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जगदीशच्या सतर्कतेमुळे तरुणीचे प्राण वाचवल्याची चर्चा परिसरात होती. 

युवकाची आत्महत्या -
गांधीसागर तलावात उडी घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज बुधवारी दुपारी उघडकीस आली. सतीश दुमकुडवार (तेलीपुरा, सीताबर्डी) असे मृत युवकाचे नाव आहे. तो बुधवारी पहाटेच्या सुमारास घरातून निघाला होता. त्याने पहाटेच्या सुमारास तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी जगदीश खरे तलाव स्वच्छ करीत असताना त्याला तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार गटाची गुप्त बैठक; पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये चर्चा, अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात?

Tech Tips : गाडी चालवताना येतो कटकट आवाज? लगेच चेक करून घ्या 'हा' पार्ट , नाहीतर होऊ शकतो मोठा अपघात

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गांवर विशेष मेगाब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना फटका; पाहा लोकलचं वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : ‘डेंटल डिझाईन’ क्लिनिकचे CCTV सीबीआयच्या ताब्यात; मनिषा वाघमारे प्रकरणाचा तपास वेगात

लखनौकडून चेन्नईचा धुव्वा! ऋतुराज गायकवाडने पराभवानंतर मान्य केली मोठी चूक, म्हणाला आम्ही...

SCROLL FOR NEXT