jai jawan jai kisan president prashant pawar criticized bjp government about nagpur metro 
नागपूर

'नागपूर मेट्रो विकण्याचा घाट घातला जातोय'

अतुल मेहेरे

नागपूर : नागपूर मेट्रोतून होणारी कमाई आता बंद झाल्याने मेट्रो विकण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रपरिषदेत केला. सुमारे ८ हजार ६०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला नागपुरातील माझी मेट्रो प्रकल्प बीओटीवर देण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्यातून मिळत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे सरकारवर अवलंबून न राहता बीओटी तत्वावर कामांना वेग देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गडकरींनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. मेट्रो रेल्वेचा अधिक फायदा बीओटी तत्वावर चालविण्यास दिल्यास होऊ शकतो, असे सुतोवाचही गडकरींनी केले होते. त्याचा आधार घेत प्रशांत पवार यांनी मेट्रो बीओटीवर चालविण्यास देण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप केला आहे.   

नागपूर मेट्रोच्या अनेक स्थानकांचे काम अजून व्हायचे असतानाही काही स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, त्याला सुरुवातीपासून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, कोरोनामुळे वाहतूक बंदच होती. अनलॉकनंतर वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यावर मेट्रो प्रशासनाने उत्पन्न मिळवण्यासाठी मेट्रोच्या डब्यात वाढदिवस समारंभ, लग्नाचे फोटो शूट, लग्नाचा वाढदिवस, सायकल घेऊन जाणे असे उपक्रम सुरू केले. मात्र, त्यालाही प्रतिसाद नाही.

मेट्रोला दिलेल्या जागांवर डोळा -
मेट्रो प्रकल्पासाठी महापालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यासच्या सुमारे १० हजार कोटींच्या जागा देण्यात आल्या आहे. या जागांवर अनेकांचा डोळा आहे. त्या ताब्यात घेण्यासाठी मेट्रो बीओटीवर देण्याचा वा विकण्याचा घाट घातल्या जात असल्याचे पवार म्हणाले. नागपूरसह पुणे व नाशिक मेट्रोचे थर्ड पार्टी 
ऑडिट करण्यात यावे. कारण मेट्रोत २,५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप पवार यांनी केला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT