Kanchan Gadkari traveled by Metro
Kanchan Gadkari traveled by Metro 
नागपूर

कांचन गडकरी म्हणाल्या, ‘हे नागपूर की सिंगापूर’; नागपूरच्या वैभवात मानाचा तुरा

राजेश प्रायकर

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी तसेच सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी सोमवारी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रो प्रवासाचा आनंद लुटताना अलगद ‘हे नागपूर की सिंगापूर’ असे गौरवोद्‍गार त्यांनी काढले. त्यांनी झाशी राणी मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंत मेट्रोतून प्रवास केला.

गेल्या काही दिवसांत मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेकांना मेट्रोतून प्रवासाचा मोह आवरता आला नाही. आज केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी व सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी सहकाऱ्यांसोबत मेट्रोतून प्रवास केला.

मेट्रोच्या लोकार्पणानंतर केंद्रीयमंत्री गडकरी यांनी मेट्रोतून प्रवास केला. परंतु सोमवारी प्रथमच त्यांच्या सौभाग्यवतींनी प्रवास केला. त्यांनी महामेट्रोचे कार्ड खरेदी केले. त्याचा वापर करीत त्यांनी मेट्रोतून प्रवासाचा आनंद लुटला.

हिंगणा मार्गावरील अंबाझरीचे सौंदर्यही त्यांनी टिपले. यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवासादरम्यान येथील सुविधांचे कौतुक केले. माझी मेट्रो नागपूरच्या वैभवात मानाचा तुरा असल्याचे त्या म्हणाल्या. मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान नागपूर नव्हे तर सिंगापूरसारख्या शहरात असल्याचे भासते, असे त्या म्हणाल्या.

नागपूरकरांना उत्कृष्ट वाहतूक सेवा यानिमित्त मिळाली असून अतिशय कमी दरामध्ये जास्तीत जास्त अंतर कापता येते, नागपूरकरांनी या सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक स्टेशनवरून दर १५ मिनिटांत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT