नागपूर : भंडारा ते मध्यप्रदेशातील बालाघाटाला जोडणाऱ्या तुमसर-बपेरा महामार्गाला (tumsar bapera highway) राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे मध्यप्रदेशातील कान्हा किसली व्याघ्र प्रकल्प (kanha tiger reserve) थेट नागपूरशी जुळणार आहे. (kanha tiger reserve will connect to nagpur via tumsar balaghat highway)
केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. बुधवारी या महामार्गाची अधिसूचनासुद्धा जारी झाली. या महामार्गामुळे औद्योगिक व पर्यटन विकासाला गती मिळणार आहे. सध्या तुमसर-बपेरा राज्यमार्ग आहे. त्याची नियमित देखरेख होत नसल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. बपेरा आणि मध्यप्रदेशातील मोवाडा सीमेला जोडणाऱ्या बावनथडी नदीवरचा पूलही अरुंद आहे. महामार्गाच्या निमिर्तीमुळे रस्ते रुंद होईल आणि नागपूर-बालाघाट अंतरही कमी होणार आहे.
कान्हा-ताडोबा पॅकेज करणार -
बालाघाट व मंडला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कान्हा किसली व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. त्यासाठी प्रामुख्याने नागपूर मार्गेच जावे लागते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबालाही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे तुमसर-मोहाडी येथून पवनी मार्गाला चंद्रपूरशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी कान्हा आणि ताडोबा असे पॅकेज उपलब्ध होऊ शकते. रामटेक-तुमसर ते रायपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग तयार झालेला आहे. मध्यप्रदेशातील सिवनी बरघाट ते बालाघाटाला जोडणाऱ्या महामार्गाचेही काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.