Kondhali police arrested truck driver by using fast tag information  
नागपूर

कोंढाळी पोलिसांची कमाल! फास्ट टॅगवरून लावला तिघांना चिरडणाऱ्या फरार आरोपीचा छडा

संजय आगरकर

कोंढाळी (जि नागपूर): येथील सबा ढाब्यासमोर तिन ट्रक चालकांना चिरडून ट्रक सह फरार ट्रक चालकाचा ट्रकला लागलेल्या फॉस्ट टॉगच्या आधारे शोध घेऊन आज कोंढाळी पोलिसांनी अखेर नागपूर येथुन अटक केली.

कोंढाळी अमरावती मार्गावर सबा ढाब्यासमोर दिनांक 28 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता नागपूरकडून अमरावती जिल्हातील तिवसाकडे तांदूळ भरून जाणारे अकोला येथील  एम एच 30 ऐ बी 1279 व एम एच 30 ऐ बी 3861 चे चालक जेवण  करण्याकरीता ऐका मागे एक थांबले पण ट्रक चालकांनी ट्रक ढाब्यांच्या पार्किंगमध्ये न लावता ट्रक समोर लावला व दोन्ही ट्रकमधिल पांच लोक  ट्रक जवळच थांबले असतांना मागुन भरधाव वेगात येणारा अज्ञात ट्रक दोन्ही ट्रकला घासत गेला. 

यात ट्रक चालक शेख अन्नु (20 रा. शिवनी अकोला), जावेद खान (28 खदान अकोला). शेख पप्पू ऊर्फ शेख परवेज ( 35 रा. नादेळ हल्ली मु. वाशिम बायपास अकोला) यांचा चिरडून जागीच मृत्यु झाला. 

या तिघांचे मृतदेह चेंदामेंदा झाले तर फिरोज खान 45रा. अकोला हा गंभिर जखमी झाला तर क्लिनर  सोहेल खान 18 हा उडी मारून उभ्या ट्रक खाली लपल्याने सुखरुप बचावला. सोहेल खान धडक देणाऱ्या ट्रक मागे धावला पण ट्रक अमरावतीकडे फरार झाला. अपघात होतात अंन्सार बेग सहकारी सह मदतीला धावले त्यांनी जखमी फिरोज खानला तातडीने कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवीले कोंढाळी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाने एएसआय दिलिप इंगळे हे. कॉन्स्टेबल दारासिंग राठोड, किशोर बोबडे आदी घटनास्थळी पोहोचले व मृतकांचा पंचनामा करून मृतदेह काटोल ग्रामिण रूग्णालय येथे रवाना केले तर  कोंढाळी चे ठाणेदार श्याम गव्हाने यांनी धडक देणाऱ्यां ट्रकचा पाठलाग सुरु केला.

सीसीटीव्हीद्वारे मिळाली माहिती 

ट्रक मिळाला नाही पण धडक देणाऱ्यां ट्रकचे कोंढाळी तळेगांव मार्गावरील कारंजा (घाडगे) येथील ओरियंटल कंपनीच्या टोल नाक्यावर धडक देणाऱ्यां  ट्रकचे फुटेज मिळाले. या ट्रकने  रात्री 12.30 वाजता कारंजा (घाडगे) नजीच ओरियंटलचा टोल पास केला पण ट्रकचा नंबर टोल नाक्यावरील फुटेज मध्ये स्पष्ट दिसत नव्हता.

फास्टटॅगच्या माध्यमातून लावला छडा  

कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाने यांनी ट्रकला फॉस्टटॉग लागला असल्याने फॉस्ट टॉगची माहिती घेतली व ट्रकचा शोध सुरू केला. ट्रक ला लागलेला फॉस्ट टॉग हा नागपूर येथील आयडीएफसी बँकेचा होता म्हणुन  तीन लोकांना चिरडणाऱ्यां ट्रकचा क्रमांक  एम एच 40 बी जी 3740 व मालक मनोज शामसुंदर यादव 45 रा. लष्करीबाग नागपूर हा असल्याची माहिती मिळाली. कोंढाळी पोलिस सतत या ट्रकच्या मागे होते आज दिनांक 6 अक्टोबरला ट्रक नागपूर येथे आल्याची गुप्त माहितीच्या आधारे कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाने यांनी ट्रक चालक मालक मनोज शामसुंदर यादव 45 यांला अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT