Kovid Hospital with 16 beds for police in Nagpur 
नागपूर

उपराजधानीत पोलिसांसाठी वेगळे कोविड हॉस्पिटल, पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन

अनिल कांबळे

नागपूर  ः डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे पोलिस पहिल्या फळीत कोरोनाविरुध्दची लढाई लढताहेत. या लढाईत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना झाला. आजही पोलिस खंबीरपणे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. त्याचे आरोग्य जपण्यासाठी आम्ही सक्षम असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

पोलिस मुख्यालयात पोलिसांसाठी १६ बेडच्या स्वतंत्र कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. गृहमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते या स्वतंत्र रुग्णालयाचे सोमवारी ‘ऑनलाइन’ लोकार्पण झाले.
राज्य पोलिस दलातील २० हजार पोलिस अधिकारी कर्मचारी करोनाबाधित झाले. २१७ अधिकारी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटलची मागणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली होती.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी तत्काळ यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आठ दिवसांत अमितेशकुमार, पोलिस सहआयुक्त डॉ. नीलेश भरणे, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी १६ खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय निर्माण केले. नागपूरप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यातील मुख्यालयात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्याच्या सूचनाही ना. देशमुख यांनी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना यावेळी केली.

डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोरोना योद्धे आजारी पडणे ही चिंतेची बाब आहे. या रुग्णालयासाठी तत्काळ ५० लाखांचा निधी देण्यात आला. अवघ्या आठ दिवसांत सर्व सुविधायुक्त रुग्णालय तयार झाले. पोलिसांना आवश्यक ती सर्वच मदत करण्याचे आश्वासनही राऊत यांनी यावेळी दिले.

सर्वांच्या सहकार्याने अल्पावधीत हे रुग्णालय तयार झाल्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल म्हणाले.शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित पोलिसांना वेळेवर बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली.

हे रुग्णालय सर्व अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रांनी सुसज्जित आहे. सुसज्जित चार रुग्णवाहिका डॉक्टरांसह हॉस्पिटलमध्ये आहेत. पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रास्ताविकात सांगितले. संचालन पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी तर आभार मुख्यालयाचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी मानले.

नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलिस सहआयुक्त डॉ. नीलेश भरणे, नागपूर ग्रामीणचे अधीक्षक राकेश ओला, सर्वच उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यावेळी उपस्थित होते.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवर्षात वाजणार झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल! पहिल्यांदा १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक; २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असा असणार...

अग्रलेख - सतरंज्यांचा उठाव

मोठी बातमी! नववर्षात राज्यातील सर्व शाळांमधील पटसंख्येची एकाचवेळी होणार पडताळणी; महसूल, शिक्षण विभागाचे असणार अधिकारी; बोगस पटसंख्येचा होणार पर्दाफाश

आजचे राशिभविष्य - 27 डिसेंबर 2025

Morning Breakfast Recipe: कांदा नाही तरी पकोडे होतील सुपरहिट! पालक पकोड्यांची अशी रेसिपी कधी पाहिली नसेल

SCROLL FOR NEXT