Lakhs of losses have been avoided by honest RPF personnel 
नागपूर

प्रामाणिक आरपीएफ जवानांमुळे टळले लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वेतून उतरण्याच्या धावपळीत प्रवासी महिला हिरेजडीत दागिन्यांसह 26 लाखाहून अधिकचा मुद्देमाल असलेली पर्स रेल्वेतच विसरली. थोड्याच वेळात पर्स रेल्वेतच विसरल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि त्या तक्रार देण्यासाठी परत आल्या. पण, तोवर ट्रेन फलाटावरुन निघून गेली होती. आरपीएफ जवानांनी सजगता दाखवली आणि धावपळ करीत ही पर्स शोधून दिली. पर्स परत मिळाल्याने महिलेचा जीव भांड्यात पडला.


त्रिशाला ढेंगरे (52) असे पर्स परत मिळालेल्या सुदैवी महिला प्रवाशाचे नाव आहे. त्या नागपूरच्या बहिरामटी टाऊन येथील रहिवासी आहेत. त्या कामानिमित्त मुंबईला गेल्या होत्या. काम झाल्यानंतर मुंबई - नागपूर दुरांतोच्या ए-3 कोचमधील 39 क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करीत नागपुरात परतल्या. अजनी स्टेशनवर गाडी थांबताच त्या अन्य सामान घेऊन खाली उतरल्या. पण, धावपळीत हॅन्ड पर्स गाडीतच विसरल्या. पर्समध्ये 11 लाख रुपये किमतीचे एक हिरेजडीत नेकलेस आणि चार हिरेजडित बांगड्या, 15 लाख रुपयांच्या एफडी, 42 हजार 570 रुपये रोख व अन्य साहित्य असा एकूण 26 लाख 42 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल होता. पर्स गाडीतच राहिल्याचे लक्षात येताच त्यांची भंबेरीच उडाली. घाबरलेल्या अवस्थेत त्या स्टेशनवर परत आल्या. त्यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक हे. के. दिवान यांना घटनेची माहिती दिली. दिवाण यांनी तत्परता दाखवित गाडीचे लोकेशन घेतले. गाडी यार्डमध्ये उभी असल्याची माहिती मिळताच ते कॉन्स्टेबल अनिल बिंड आणि मनोज कुमार चौधरी यांना घेऊन यार्डपरिसरात पोहोचले. डब्यात शोघ घेतला असता पर्स मिळाली. पर्समधील मुद्देमालही सुरक्षित होता. यानंतर ठाण्यात आणून पर्स त्यांचीच असल्याची खात्री करून घेण्यात आली. कागदोपत्री कारवाईनंतर पर्स ढेंगरे यांना परत देण्यात आली. पर्स मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. ढेंगरे यांनी जवानांनी दाखविलेल्या तत्परतेसाठी धन्यवाद दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT