नागपूर

नोंदणी सोडाच लिंक उघडण्याच्या प्रतीक्षेतच गेला अख्खा दिवस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ऑटोचालकांना (Auto drivers) सानुग्रह अनुदानासाठी शनिवारपासून ऑनलाइन नोंदणी (Online Registration) करता येणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु, आज दिवसभर प्रतीक्षा करूनही नोंदणीसाठीची लिंकच न उघडल्याने ऑटोचालकांची निराशा झाली. याप्रकारावर ऑटोचालकांनी संतप्त भावना व्यक्त केली. (link for grants of auto driver not opened whole day)

लॉकडाउनच्या काळात नुकसान झाल्याने सरकारकडून ऑटोचालकांना प्रत्येकी दीड हजारांची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. शुक्रवारीच प्रादेशिक परिवहन विभागात यासंदर्भात ऑटोचालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन अर्ज नोंदणीबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.

शनिवारपासून नोंदणीची लिंक सुरू होणार होती. संघटनांच्या प्रतिनिधींमार्फत ही माहिती ऑटोचालकांपर्यंत पोहोचली. त्यानुसार आज सकाळपासूनच नोंदणीचे प्रयत्न सुरू झाले. पण, लिंकच उघडत नसल्याने ऑटोचालकांकडून एकमेकांना विचारणा सुरू करण्यात आली. संघटनांच्या प्रतिनिधींकडेही वारंवार विचारणा करण्यात येत होती.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तांत्रिक अडचणी असून रात्रीपर्यंत लिंक सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली. रात्रीपर्यंत प्रयत्न करूनही लिंकच न उघडल्याने एकही नोंदणी होऊ शकली नाही.

एकतर ऑटोचालकांना मिळणारी मदत तुटपुंजी आहे. संकटात असणाऱ्या ऑटोचालकांनी त्यावरही समाधान व्यक्त केले. पण, दिवसभर प्रयत्न करूनही लिंक उघडली नाही. हा प्रकार जखमेवर मीठ चोळणारा आहे.
विलास भालेकर, अध्यक्ष, विदर्भ ऑटोरिक्षाचालक फेडरेशन.

(link for grants of auto driver not opened whole day)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Satara News: सातारा जिल्ह्यातील ७६ गावे चकाचक; ओडीएफ प्लस मॉडेल म्हणून घोषित, अनेक गावांनाही प्रेरणा !

Satara politics: साताऱ्यात राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांशी पालकमंत्र्यांची खलबते; शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?, बंद दाराआड काय घडलं?

Municipal Corporation Election Result 2026 : मुंबईचा किंग कोण ? राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज, सत्ता कुणाची याकडे देशाचे लक्ष

Ragi Soup Recipe: वजन कमी करायचंय? मग सकाळी नाश्त्यात झटपट बनवा रागी सुप, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT