liquor seized from danapur express at nagpur railway station 
नागपूर

दानापूर एक्सप्रेसमधून मद्यसाठा जप्त, नागपूर आरपीएफची कारवाई

योगेश बरवड

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने सोमावारी नागपूर रेल्वेस्थानकावर येऊन थांबलेल्या दानापूर एक्स्प्रेसमध्ये कारवाई करीत मद्यतस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. स्लिपर डब्यातून विदेशी मद्याच्या एकूण १३० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

अंमलीपदार्थांची तस्करी व अनधिकृत वेंडर्सना अटकाव घालण्यासह गुन्ह्यांच्या तपासासाठी आरपीएफने विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून सातत्याने रेल्वेगाड्यांमध्ये अचानक तपासणी केली जात आहे. सोमवारी सकाळी पथकातील सदस्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी नागपूर रेल्वेस्थानकावर संयुक्तरित्या गस्त घालत होते. ११.४० वाजण्याच्या सुमारास हे पथक फलाट क्रमांक २ वर असताना दानापूर एक्स्प्रेस येऊन थांबली. जवानांनी वेगवेगळ्या डब्यांचा ताबा घेत तपासणी सुरू केली. एस-१० क्रमांकाच्या डब्यात तपासणी दरम्यान एक पोते बेवारस अवस्थेत पडून असल्याचे आढळले. प्रवाशांकडे विचारणा केली असता, कुणीही माहिती देऊ शकले नाही.

संशयामुळे पोते उघडून बघितले असता आत ११ हजार रुपये किमतीच्या दारूच्या १३० बाटल्या आढळून आल्या. हा मद्यसाठा जप्त करून पुढील कारवाईसाठी प्रकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. कारवाईत उपनिरीक्षक सचिन दलाल, उषा तिग्गा, भारत माने, श्याम झाडोकार, जितेंद्र कुमार,  राज्य उत्पादन शुल्क विभागचे उपनिरीक्षक विनोद भोयर, चंदु गोबाडे आदींचा समावेश होता. जप्त करण्यात आलेली दारू मध्य प्रदेशात निर्मित असून ती दारूबंदी असलेल्या वर्धा किंवा चंद्रपूर जिल्ह्यात नेली जात असावी, असे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT