नागपूर : जिल्ह्यातील अनेकांसाठी घर ही आता असुरक्षित जागा झाली आहे. स्त्रियांसह मुलांच्या जीवनावर कौटुंबिक कलहामुळे प्रतिकुल परिणाम झाला आहे. या प्रमाणात आता ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे कौटुंबिक न्यायालयामधील प्रलंबित प्रकरणांच्या आकड्यांवरून समोर आले आहे.
भारतात २४ मार्च २०२० रोजी लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे पती-पत्नी आणि घरची इतर मंडळी २४ तास घरीच राहू लागली. या काळात निर्माण झालेला वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बलात्काराचे प्रमाण घटल्याचे म्हटले असले, तरी कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
पोलिस प्रशासन कोरोनाशी लढ्यात गुंतलेले असताना पीडित महिलांना मदत मिळावी यासाठी उपाययोजनादेखील असणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकड्यानुसार या लॉकडाउनच्या काळात आलेल्या तक्रारी सामान्य काळाच्या तुलनेत दुपटीने वाढल्या आहेत.
आजही समाजातील रूढीवादी विचारसरणीचा पगडा कमी झालेला दिसत नाही. घरकाम स्त्रियांचे, तर बाहेर जाऊन पैसे कमावणे हे पुरुषांचे काम आहे, असे चित्र आपल्या समाजामध्ये आहे. लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या पुरुषांना घरकाम करण्यास सांगितल्यावर त्यांचा अहंकार दुखावला जातो. तसेच बंद पडलेले उद्योगधंदे, बेरोजगारी, पगारातील कपात, आर्थिक अडचणी, गरिबी, या सर्व संकटातून आपण सावरू की नाही याची भीती, दडपण, राग आदी कारणे कौटुंबिक हिंसाचाराला पूरक असे वातावरण निर्माण करतात.
न्यायालयात प्रलंबित प्रकरणे
वर्ष | दिवाणी | फौजदारी |
२०१९ | ४५४३ | २७६१ |
२०२० (आठ महिने) | ४९९० | ३००५ |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.