lovers commit suicide lovers commit suicide
नागपूर

प्रेमीयुगुलाने उचलले भयावह पाऊल; रुग्णालयात रात्री मृत्यू

दोघेही अल्पवयीन असल्याने लग्न करण्यातही अडचणी आल्या

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील मोवाड जवळील गोधणी फाट्याजवळ दिलीप बोडखे यांच्या शेतात अल्पवयीन प्रेमीयुगुलाने काल विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रेमाची गावात झालेली वाच्यता आणि अल्पवयीन असल्याने लग्न करण्यासाठी येणाऱ्या अडचणीमुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. सुरज वगारे (वय १८, रा. महेंद्री) आणि रसिका सुनील गायकवाड (वय १६) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुलगी मामा जवळ शिक्षणासाठी राहत होती. काही दिवसांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. परंतु, अलीकडेच त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती गावातील नागरिकांना लागली होती. प्रेमसंबंधाची वाच्यता झाल्यानंतर बदनामी टाळण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. परंतु, दोघेही अल्पवयीन असल्याने लग्न करण्यातही अडचणी आल्या. यामुळे दोघंही काही दिवसांपासून नैराश्याचा (Decisions out of frustration) सामना करीत होते. अशातच दोघांनी एकत्रित आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी आपापल्या घरून पळ काढला व जलालखेडा येथून ऑटोने मोवाडला गेले. मोवाडपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोधणी फाट्याजवळ दिलीप बोडखे यांच्या शेतात विष प्राशन केलेले आढळून आले. ते बेशुद्ध अवस्थेत उमरी येथून येत असलेल्या तीन तरुणांना दिसले. त्यांनी लगेच त्यांना मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक औषधोपचार करून गंभीर असल्याने नागपूरला हलविले. नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांचा रुग्णालयात रात्रीच मृत्यू (Death in hospital) झाला. ही घटना उघडकीस येताच तालुक्यात एकच खळबळ उडाली.

मुलगी सायंकाळी झाली तरी घरी परत आली नसल्याने मामाने जलालखेडा पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. जलालखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरूच केला होता. तेवढ्यात ती व प्रियकराने नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विष प्राशन केल्याची माहिती मिळाली. घटनेचा तपास जलालखेडा व नरखेड पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT